शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलीची 'कमाली'ची सतर्कता; सावत्र आईच्या छळाची माहिती दिली थेट 'चाईल्ड हेल्पलाईन'ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 19:25 IST

कोंढव्यातील एका ८ वर्षाच्या मुलीचा तिची सावत्र आई छळ करीत होती.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या ट्विटरवर मुलाच्या छळाची माहिती : सावत्र आई व वडिलांवर गुन्हा दाखल

पुणे : कोंढव्यातील एका ८ वर्षाच्या मुलीचा तिची सावत्र आई छळ करीत होती. तिला जेवायला न देता मारहाण करुन हकलून दिले होते. त्यामुळे ती बाहेर फिरत होती. रात्रीच्या वेळी तिने एका घरात पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा घरातील माऊलीने तिची चौकशी केल्यावर सावत्र आई छळ करीत असल्याचे समजले. यावेळी या माऊलीची लहान मुलगी तेथेच होती. तिला चाईल्ड हेल्पलाईनचा नंबर माहिती होता. तिने दुसर्‍या दिवशी चाईल्ड हेल्प लाईनला फोन करुन या मुलीची माहिती दिली. हा कॉल पुण्यातील ज्ञानदेवी चाईल्ड हेल्पलाईनकडे आला. त्यांनी कोंढवापोलिसांच्या मदतीने भाग्योदयनगर येथील या मुलीचे घर शोधून काढले. तिच्या आई वडिलांना विचारणा केली. पण, ही मुलगी सावत्र आईच्या त्रासाला इतकी कंटाळली होती. की तिने त्यांच्याबरोबर राहण्यास नकार दिला. मुलीला सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे. अर्पणा मोडक यांच्या फिर्यादीवरुन कोंढवापोलिसांनी सावत्र आई व वडील यांच्यावर गुुन्हा दाखल केला आहे. 

दुसर्‍या एका घटनेत सावत्र वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र वडिलांकडून ११ वर्षाच्या मुलीला आंब्याच्या पेटीच्या फळीने मारहाण करुन तिला जखमी केल्याचे फोटो एका नागरिकांने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या

ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी त्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. वडील हे गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या सावत्र मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होता. वेळोवेळी जेवण न देता उपाशी ठेवत होता. दोन्ही घटनांमध्ये ज्युवेनाईल जस्टीस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ..........१०९८ हेल्पलाईन नंबर वर द्या माहितीअल्पवयीन मुलांचा छळ होत असेल. त्यांना कामाला जुंपले जात असेल तर त्यांच्यावरील अन्याय दूर करुन त्यांना मदत करण्यासाठी देशभरात चाईल्ड हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये स्वयंसेवी संस्था त्यांचे काम पहातात. पुण्यात ज्ञानदेवी हेल्पलाईन संस्था हे काम पहाते. लहान मुलांवर अन्याय, अत्याचार होत असल्याचे दिसताच 1098 या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावी.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKondhvaकोंढवाcommissionerआयुक्त