शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक कलावंत संमेलन २४, २५ डिसेंबरला रंगणार पुण्यात; संमेलनाध्यक्षपदी निशिकांत मिरजकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 12:50 IST

साहित्यिक कलावंत संमेलन २४ आणि २५ डिसेंबर रोजी  यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत.

ठळक मुद्देसिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटनसंमेलनात चित्रप्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, विंदादर्शन, कविसंमेलन, जीवनगाणे, कथाकथन आदी कार्यक्रम

पुणे : साहित्यिक कलावंत संमेलन २४ आणि २५ डिसेंबर रोजी  यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. तर यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना वाग्यज्ञे साहित्य व कलागौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी संमेलनाध्यक्ष डॉ. निशिकांत मिरजकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक आणि सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी दिली. वि. दा. पिंगळे उपस्थित होते.संमेलनात चित्रप्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, विंदादर्शन, कविसंमेलन, जीवनगाणे, कथाकथन आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी ४ वाजता ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. या परिसंवादात तुषार गांधी, प्रा. डॉ. शशिकला राय आणि संजय आवटे सहभागी होणार आहेत.  संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ‘सामाजिक परिवर्तन आणि आजचे मराठी साहित्य’ या विषयावर उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये राजन खान, इंदुमती जोंधळे आणि विजय बाविस्कर भाग घेणार आहेत. दुपारी २ वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची प्रकट मुलाखत होईल.दुपारी ४ वाजता गिरीश ओक आणि अशोक नायगावकर यांना डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते वाग्यज्ञे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विविध साहित्यिक आणि कलावंतांचा सहभाग असलेल्या आणि बहुरंगी कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या या संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही बराटे यांनी सांगितले.

टॅग्स :S B Mujumdarशां. ब. मुजुमदारShripal Sabnisश्रीपाल सबनीसMukta Tilakमुक्ता टिळकGirish oakगिरिश ओक