शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अन् दुधाच्या ' कॅन ' मध्ये चक्क सापडली 'हातभट्टी' दारू; पुण्यातली अजब घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:18 IST

संपूर्ण बंद व रस्त्यां रस्त्यांवर नाकाबंदी असतानाही शहरात हातभट्टीचा सुकाळ कसा झाला याचे कोडे अनेकांना पडले होते...

पुणे : लॉकडाऊनमुळे जीवनाश्यक वस्तू सोडून सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. त्यामुळे नियमित दारु पिणार्‍यांची चांगली पंचाईत झाली आहे. सरकारी दारु बंद झाल्याने सध्या बेकायदेशीर हातभट्टीला चांगलाच डिमांड आला आहे. संपूर्ण बंद व रस्त्यां रस्त्यांवर नाकाबंदी असतानाही शहरात हातभट्टीचा सुकाळ कसा झाला, याचे कोडे अनेकांना पडले होते. कोथरुड पोलिसांच्या नाकाबंदीत हे कोडे सुटले. मोटारसायकलला दुधाचे कॅन लावून बावधन कडून येणार्‍या दोघांना त्यांनी तपासणी केली तर त्याच्याकडील दुधाच्या कॅनमध्ये चक्क हातभट्टीची दारु आढळून आली.मनोहर मारुती कळवनकर (वय ४३, रा. केळेवाडी, कोथरुड) आणि संतोष सुरेश यादव (वय ३६, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील दुधाच्या कॅनमधील ८ लिटर दारु व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.शहरात लागू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यासाठी चांदणी चौकाजवळ नाकाबंदी करण्यात आली आहे. बुधवारी तेथे सहायक पोलीस निरीक्षक बाबर व इतर नाकाबंदी करीत होते.  पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार दत्ता शिंदे, विलास जोरी, विलास ढोले, विजय कांबळे, मनोज पवार, युवराज काळे, अभिजित वालगुडे हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मनोज पवार व विजय कांबळे यांना दोघे जण दुधाच्या कॅनमधून दारु घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे चांदणी चौकाजवळील जैन लोहिया आयटी पार्क येथे नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. तेव्हा कळवणकर व यादव मोटारसायकलला दुधाचा कॅन लावून येत होते. त्यांना थांबवून तपासणी केल्यावर दुधाच्या कॅनमध्ये हातभट्टीची दारु होती.

टॅग्स :Puneपुणेkothrud policeकोथरूड पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसliquor banदारूबंदी