शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लग्न समारंभावर मर्यादा; ५० पेक्षा जास्त लोकांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 12:04 IST

लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमामध्ये लोक मोठ्या संख्येने सामील होत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देग्रामीण पोलीस अधिक्षकांचा आदेश, घरगुती कार्यक्रमातही संख्येवर मर्यादा

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे लग्न व इतर समारंभात ५० पेक्षा जास्त येणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचा आदेश ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी काढला आहे.

लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमामध्ये लोक मोठ्या संख्येने सामील होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. लॉकडाऊनमुळे गेल्या ८ महिन्यात अनेक समारंभ पुढे ढकलले गेले आहेत. त्यामुळे या पुढील काळात लग्नासह अनेक इतर समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय व्यावसायिकांनी दिलेल्या सूचना व अटींचे पालन करावे. लग्न व इतर समारंभासाठी येणाऱ्या लोकांची यादी संबंधित व्यावसायिकांनी स्वत:कडे ठेवावी़ सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. बेकायदा जमाव/ कायद्याचे उल्लंघन करु नये़ अन्यथा आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या