लोणावळा परिसरात हलक्या पावसाची हजेरी, दिवसभर ढगाळ वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 17:45 IST2024-01-09T17:43:10+5:302024-01-09T17:45:28+5:30
अखेर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पावसाने हलकी हजेरी लावली. दुपारी पुन्हा हलका पाऊस झाला...

लोणावळा परिसरात हलक्या पावसाची हजेरी, दिवसभर ढगाळ वातावरण
लोणावळा (पुणे) :लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात मंगळवारी सकाळी व दुपारी हलक्या पावसाने हजेरी लावली. परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पावसाने हलकी हजेरी लावली. दुपारी पुन्हा हलका पाऊस झाला.
सध्या अरबी समुद्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे व पूर्वेकडून आर्द्रता युक्त वारे येत असल्याने महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन तीन दिवसांपासून थंडी कमी झाली असून दिवसा व रात्री हवा सुटत आहे. ऐन थंडीच्या काळात नागरिकांना पाऊस पाहायला मिळत आहे.