शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

कर्बभार कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे; ‘कर्बवापर’वर गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:34 PM

मराठी विज्ञान परिषद, मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देकार्बनचक्रात दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेप वाढत आहे : डॉ. प्रियदर्शिनी कर्वेसेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात वैज्ञानिक कट्टा

पुणे : ‘कार्बनचक्रात दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेप वाढत आहे. प्रत्येकाने आपला कर्बभार नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल घडवून आणणे गरजेचे असून, सर्वांनी एकत्रितपणे सामाजिक व व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करायला हवेत’, असे मत पुण्यातील समुचित एन्व्हायरोटेकच्या संचालिका डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषद, मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. कर्वे बोलत होत्या. ‘मोजा आपला कर्बवापर’ या विषयावर डॉ. कर्वे यांनी विज्ञानप्रेमींशी गप्पा मारल्या. याप्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर, अ‍ॅड. अंजली देसाई, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.कर्वे म्हणाल्या, ‘जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार दोन हा कर्बभार आदर्श आहे. माणसाने हा कर्बभार नियंत्रित ठेवण्यासाठी स्वत:पासून सुरु करायला हवी. स्वत:च्या सवयीत बदल करायला हवा. तंत्रज्ञान बदलायला हवे. कर्बभारावर परिणाम करणारे तंत्रज्ञान टाळायला हवे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह रस्त्यांचा दर्जा उंचावला पाहिजे. शाश्वत विकासासाठी शुद्ध वातावरण असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने रोजगाराचे मार्ग शोधायला हवेत.’ या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी पर्यावरणपूरक गोष्टीचे महत्त्व पटवून दिले. सौरऊर्जा, पवनऊर्जा हे सद्यस्थितीतील इंधनांना पर्याय असल्याचेही त्या म्हणाल्या. डॉ. विद्याधर बोरकर यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. अंजली देसाई यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे