‘१०८’ सेवेने दिले ३ लाख रुग्णांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:23 IST2018-08-16T23:45:43+5:302018-08-17T00:23:41+5:30
अपघातग्रस्तांना, गंभीर रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि बीव्हीजी ग्रुपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ क्रमांकाच्या सेवेने ६ वर्षांत तब्बल ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे.

‘१०८’ सेवेने दिले ३ लाख रुग्णांना जीवनदान
पुणे - अपघातग्रस्तांना, गंभीर रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि बीव्हीजी ग्रुपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ क्रमांकाच्या सेवेने ६ वर्षांत तब्बल ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे. या सेवेच्या प्रगतिपुस्तिकेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
जिल्ह्यात वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू ओढवला. अशा रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा व बी.व्ही.जी.च्या वतीने १०८ रुग्णवाहिका २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या रुग्णसेवेने जिल्ह्यात ६ वर्षांच्या काळात ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे. या सेवेच्या प्रगतिपुस्तिकेचे अनावरण स्वातंत्र्यदिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, १०८ सेवेचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल बोडखे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी १०८ जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे व डॉ. प्रियांक जावळे यांनी प्रयत्न केले.
एकूण ८३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यातील २४ आधुनिक सेवा, तर ५९ रुग्णवाहिकांत बेसिक लाईफ सपोर्टर सेवा आहेत.