Life-threatening risk for a discount of Rs. 50 thousand ; Queue at the district bank to pay the crop loan | ५० हजारांच्या सवलतीसाठी जीवघेणा धोका ; पिक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बॅकेत रांगा

५० हजारांच्या सवलतीसाठी जीवघेणा धोका ; पिक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बॅकेत रांगा

पुणे (चाकण) :  सरकारने नियमित पिक कर्ज भरणा-या शेतक-यासाठी ५० हजारांची सवलत मिळणार असल्याचे जाहीर केले. हे पिककर्ज भरण्याची मुदत मार्च अखेर असल्याने कर्ज भरणा करण्यासाठी खेड तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखांमध्ये शेतक-यांची गर्दी उसळली आहे. यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे राज्य सरकारने याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची मागणी बँक कर्मचारी आणि शेतक-यांनी केली आहे.

 महाआघाडी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यतच्या पिककर्ज थकबाकीदारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर करुन शेतक-यांच्या बँकखात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात येत आहे. तर नियमितपणे कर्ज भरणा-यांसाठी ५० हजारांपर्यत रक्कम बोनस देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. परंतु कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावाला कमी करण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा पुरेपुर अडकुन पडली आहे.

       खेड तालुक्यात १८९ गावांमिळुन १०४ विकास सहकारी सोसायंट्यांमार्फत जवळपास २६ हजार १४३ बँक खातेदार सोसायटी सभासद शेतक-यांना १४९ कोटी ३० लाख ९० हजार रुपये गेल्या खरीप हंगामातील पिक कर्ज रुपाने जिल्हा बँकेने वाटप केले आहे. त्यात महाआघाडी सरकारने थकीत कर्जमाफी केल्यामुळे अनेक शेतक-यांना याचा फायदा मिळाला. नियमाप्रमाणे सोसायट्यामार्फत घेण्यात आलेले पिककर्ज जर  मार्च अखेर भरले तर शेतक-यांना शुन्य टक्के व्याज बसते. त्यामुळे घेतलेले कर्जाचा मार्च अखेर पर्यंत  भरणा करावा लागत असतो. त्यामुळे खेड तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या शाखांमध्ये शेतकरी पिक कजार्चा भरणा करण्यासाठी बँकेत गर्दी करु लागले आहे.

कोरोना टाळण्यासाठी दूरपर्यंत उन्हात उभे शेतकरी 

सध्या कोराना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी बँकेत ग्राहकांला गर्दी करु न देता बँकेबाहेर उन्हात रांगा लावुन ताटकळत उभे ठेवत आहेत. यामुळे संचारबंदीचे उल्लघंन होत आहे.  बँक कर्मचारीही  कोरोनाच्या भितीने धास्तावले आहे. पुर्वी सोसायटी सचिवाकडे पिककर्जाची रक्कम जमा केली जात असे. मात्र, यात  गैरप्रकार झाल्यामुळे  ही पध्दत बंद करण्यात आली आहे.  असे असले  तरी यावर बँकेने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते.  सरकारनेही याबाबत त्वरीत निर्णय घेणे आवश्यक आहे. एका बँक शाखेतंर्गत जवळपास परीसरातील वीस ते पंचवीस गावे आणि वाड्यावस्त्यांमधील शेतकरी सभासद बँक ग्राहक आहेत.

शासनाने निर्णय घेऊन गावांतील गर्दी रोखण्याची मागणी

सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लाँकडाऊन करुन संचारबंदी लागु केली आहे. शहराकडील अनेकजण कुंटुबासह गावाकडे नागरीक आले आहे. त्यामुळे सध्या गावक-यांमध्ये भितीचे वातावरण आहे. पंधरादिवस घरातच राहा असे असताना पिककर्ज भरणा करण्यासाठी विविध गावांचे शेतकरी बँकेतुन गर्दी करु लागला आहे. हे चित्र संपुर्ण राज्यातील सहकारी बँकामध्ये होणार असेल यावर तातडीने शासनाने निर्णय घेऊन गावांतील गर्दी रोखण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

Web Title: Life-threatening risk for a discount of Rs. 50 thousand ; Queue at the district bank to pay the crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.