शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वरी गटाचा परवाना रद्द

By admin | Updated: August 17, 2015 02:27 IST

केशवनगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृत धान्याचा साठा ठेवल्याच्या तक्रारीवरून पुरवठा विभागाने ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे

मुंढवा : केशवनगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृत धान्याचा साठा ठेवल्याच्या तक्रारीवरून पुरवठा विभागाने ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.केशवनगर येथे बेकायदेशीर रॉकेलसाठ्यावर कारवाईनंतर २३ जुलैला एका लेखी तक्रारीवरू न पुरवठा विभागाने केशवनगर-मुंढवा, पवार वस्ती, सर्व्हे नं. ५ येथे एका पत्र्याच्या गोदामात असलेला अनधिकृत धान्यसाठा जप्त केला. हा साठा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवल्याचा अहवाल परिमंडळ ई यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाला २८ जुलैला सादर केला. त्यात धान्य साठवणुकीची पूर्वपरवानगी न घेणे, बेकायदेशीर साठवणूक करणे आदी अहवालात नमूद करण्यात आले आहे. परिमंडळ ई यांच्या परवाना क्र. ई १९४ यानुसार तपासणीत दुकानात पंचनामा रजिस्टर नसणे, मासिक अहवाल न सादर करणे, परवानाधारकाने साठाफलक व भावफलक न लावणे, हा परवाना निळकंठ माणिकशेट्टी चालवत असल्याचे दोष नमूद केले आहेत. अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तूच्या कायदा १९५५, १९७५ मधील अटींचा भंग केल्याने ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान,अतिरिक्त साठ्याची विल्हेवाट कधी लावणार, हे निश्चित नसल्याने साठा खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी सूत्रधारांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार योगेश नाईक यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे ११ हजारांपेक्षा अधिक प्रमाणात सापडलेल्या रॉकेलचा साठा व त्याचा तपास, आरोपी याबाबत अद्याप काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (वार्ताहर)