समाजाचा दृष्टीकाेन बदलावा यासाठी एलजीबीटी कम्युनिटीचा फ्लॅशमाॅब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 20:04 IST2019-05-26T20:03:36+5:302019-05-26T20:04:24+5:30
समाजाचा एलजीबीटी कम्युनिटीकडे बघण्याचा दृष्टीकाेन बदलावा या हेतूने पहिल्यांदाच पुण्यात संभाजी बागेसमाेर फ्लॅशमाॅबचे आयाेजन करण्यात आले हाेते.

समाजाचा दृष्टीकाेन बदलावा यासाठी एलजीबीटी कम्युनिटीचा फ्लॅशमाॅब
पुणे : समाजाचा एलजीबीटी कम्युनिटीकडे बघण्याचा दृष्टीकाेन बदलावा या हेतूने पहिल्यांदाच पुण्यात संभाजी बागेसमाेर फ्लॅशमाॅबचे आयाेजन करण्यात आले हाेते. तीस तरुणांनी एकत्र येत हा फ्लॅशमाॅब केला. यावेळी पुणेकर देखील माेठ्याप्रमाणावर उपस्थित हाेते. यापुढेही विविध ठिकाणी फ्लॅशमाॅब करणार असल्याची माहिती एलजीबीटी कम्युनिटीच्या कार्यकर्त्या साेनाली दळवी यांनी दिली.
पुण्यातील संभाजी बागेसमाेर रविवारी सायंकाळी सहा वाजता हा फ्लॅशमाॅब आयाेजित करण्यात आला हाेता. कलम 377 रद्द झालेले असताना देखील समाजाचा एलजीबीटी कम्युनिटीकडे पाहण्याचा दृष्टीकाेन बदलेला नाही. त्यामुळे समाजाचा दृष्टीकाेन कुठेतरी बदलावा सगळ्यांना समानतेची वागणूक द्यावी या हेतूने प्रबाेधन करण्यासाठी फ्लॅशमाॅबचे आयाेजन करण्यात आले हाेते. विविध गाण्यांवर डान्स यावेळी सादर करण्यात आला. यावेळी पुणेकरांनी टाळ्यांचा गजरात या फ्लॅशमाॅबला प्रतिसाद झाला.
यावेळी बाेलताना साेनाली दळवी म्हणाल्या, पुण्यात पहिल्यांदा असा फ्लॅशमाॅब आयाेजित करण्यात आला हाेता. मिस या संस्थेच्या वतीने या फ्लॅशमाॅबचे आयाेजन करण्यात आले हाेते. गेल्या दाेन महिन्यापासून या फ्लॅशमाॅबची तयारी करण्यात येत हाेती. समाजाचा एलजीबीटी कम्युनिटीकडे बघण्याचा दृष्टीकाेन बदलावा यासाठी या फ्लॅशमाॅबचे आयाेजन करण्यात आले हाेते. कलम 377 रद्द झालं असलं तरी समाजाने आम्हाला अद्याप स्विकारले नाही. त्यामुळे समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकाेन बदलावा यासाठी हा फ्लॅशमाॅब आयाेजित करण्यात आला हाेता. 2 तारखेला संभाजी बागेपासून प्राईड रॅली काढण्यात येणार आहे.