शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

पावसातही गिरविले योगाचे धडे

By admin | Updated: June 22, 2015 04:36 IST

शहरात पहाटेपासूनच मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले. संततधार पावसातही नागरिकांचा योगदिन साजरा करण्याचा उत्साह कायम होता.

पुणे : शहरात पहाटेपासूनच मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले. संततधार पावसातही नागरिकांचा योगदिन साजरा करण्याचा उत्साह कायम होता. शाळा, कॉलेजची मैदाने व सभागृहांमध्ये भारतीय जनता पक्ष व विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे रविवारी योगदिन साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी प्रमुख पाहुण्यांसह नेतेमंडळी नागरिकांनी स्वत: योगासने करून योगसाधनेचे धडे गिरविल्याचे चित्र रविवारी दिसले. जागतिक योगदिन शहराच्या विविध भागांत राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, पतंजली योग, आर्ट आॅफ लिव्हिंग, शासकीय संस्था, शाळा व महाविद्यालयातर्फे उत्साहाने साजरा करण्यात आला. आर्ट आॅफ लिव्हिंग फाउंडेशनने महापालिकेच्या सणस मैदानावर सकाळी ६ वाजता योगदिनाचे आयोजन केले होते. त्यानुसार पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार जगदीश मुळीक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भारत लढ्ढा, हणमंत गायकवाड, शेखर मुंदडा यांच्या उपस्थितीत मैदानावर बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला. स्वामी प्रज्ञापाद यांनी ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन अशा वेगवेगळ्या आसनांची प्रात्यक्षिके केली व योगसनांचे महत्त्वही उलगडून सांगितले. कार्यक्रमाचा समारोप करताना बापट म्हणाले, ‘‘योगदिनानिमित्ताने योग सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा उद्देश आहे. देशातील योग ही एक क्रांतीच आहे. सर्वांपर्यंत ही क्रांती पोहोचविणारे श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव हे मला क्रांतिकारकच वाटतात. ही क्रांती त्यांनी कोणतेही हत्यार न घेता योगसाधनेद्वारे केली आहे.