शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार चित्रपट कौशल्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:14 IST

अभिनय, डिजिटल छायाचित्रण, पटकथा लेखन आणि टिव्ही लेखन याविषयांचे वीस दिवसीय अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएफटीआयआय आणि बार्टीमध्ये सामंजस्य करार  दहा दिवसांचा स्मार्टफोनवर फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रमही राबविण्यात येणार २५ शहरांमध्ये ८५ अभ्यासक्रम राबविण्यात आले असून पंधरा महिन्यात ४००० विद्यार्थ्यांना याचा फायदा

पुणे : राज्यातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या चार दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट कौशल्य आत्मसात करता यावी यासाठी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या वतीने लघु चित्रपट अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात एफटीआयआय आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला आणि बार्टीचे डायरेक्टर जनरल कैलास कानसे यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. या करारानुसार अभिनय, डिजिटल छायाचित्रण, पटकथा लेखन आणि टिव्ही लेखन याविषयांचे वीस दिवसीय अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय दहा दिवसांचा स्मार्टफोनवर फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रमही राबविण्यात येणार आहे. एफटीआयआयच्या स्किलिंग इंडिया इन फिल्म अँंड टेलिव्हिजन ( स्किफ्ट) या उपक्रमांतर्गत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत २५ शहरांमध्ये ८५ अभ्यासक्रम राबविण्यात आले असून, पंधरा महिन्यात ४००० विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. बार्टीबरोबरचा हा करार महत्वपूर्ण असून यानिमित्ताने दुर्गम भागातील विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल समाजघटकांना जागतिक चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांची  दालन खुली होण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर मधील मागासवर्गीय विद्याथर््यांची निवड दोन्ही संस्थाकडून केली जाणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयcinemaसिनेमाbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला