शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 14:36 IST

Navratri Dress, Ghagara Market: नवरात्रीच्या आधीचे व सुरु झाल्यानंतरचे दोन दिवस पावसात गेले आहेत. आज कुठे कडक उन पडले आहे.

- हेमंत बावकरनवरात्रीला दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबरला जीएसटी कमी झाल्याने वाहन, इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. परंतू, पुण्यातील उत्सव काळात गजबजलेल्या कपड्यांच्या मार्केटमध्ये पावसाच्या धास्तीने शुकशुकाट पसरलेला होता. पावसामुळे धंदाच होत नसल्याचे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. 

नवरात्रीच्या आधीचे व सुरु झाल्यानंतरचे दोन दिवस पावसात गेले आहेत. आज कुठे कडक उन पडले आहे. हवामान विभागाने पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे याचा परिणाम नवरात्रीतील दांडियावर झाला आहे. दांडिया खेळण्यासाठी महिलांची पहिली पसंती घागऱ्याला असते. विविध नक्षीकाम केलेले, नव्या पॅटर्नचे ड्रेसही पसंत केले जातात. परंतू, पावसामुळे दांडियावरच पाणी फिरत असल्याने महिला वर्गाने या दरवर्षीच्या वेगळे, हटके दिसण्याच्या शॉपिंगकडेच पाठ फिरविली होती. 

रविवार पेठेत मंगळवारी तसा शुकशुकाट होता. कपड्यांच्या एका दुकानात दोन व्यापारी एकत्र आले होते. यंदा नवरात्रीत पावसामुळे धंदाच होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. येत्या काळात जर पावसाने उसंत घेतली तर महिलावर्ग शॉपिंगला येण्याची शक्यता आहे. अन्यथा नवरात्रीची खरेदी दिवाळीलाच होण्याची शक्यता आहे. 

नवरात्रीमुळे व्यापाऱ्यांनी नवीन पॅटर्न, नवीन डिझाईन, रंगसंगतीचे कपडे आणलेले आहेत. साध्या दांडिया अगदी २० रुपयांपासून मिळत आहेत. परंतू, म्हणावी तशी गर्दी दुकानांत दिसत नाहीय. पावसामुळे दोन दिवसांचे दांडिया पाण्यात गेले आहेत. याचा फटका जीएसटी कमी झाला तरी व्यापाऱ्यांवर झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's Raviwar Peth deserted during Navratri due to rain.

Web Summary : Rain dampened Navratri celebrations in Pune, leaving Raviwar Peth's clothing market deserted. Merchants lament the lack of customers, hoping for a break in the weather to revive sales. The usual demand for ghagras and festive attire has diminished due to the downpour.
टॅग्स :Navratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५Navratriनवरात्रीPuneपुणे