डुंबरेवस्तीवर बिबट्याची ४ दिवसांपासून दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:28+5:302021-02-05T05:07:28+5:30

डुंबरेवस्तीचा परिसर हा भीमा नदीच्या लगतचा परिसर आहे. तसेच, बागायती व उसाचा परिसर असल्यामुळे डुंबरेवस्तीवर,शेतात दिवसाढवळ्या बिबट्याचे ...

Leopard terror on Dumbarevasti for 4 days | डुंबरेवस्तीवर बिबट्याची ४ दिवसांपासून दहशत

डुंबरेवस्तीवर बिबट्याची ४ दिवसांपासून दहशत

डुंबरेवस्तीचा परिसर हा भीमा नदीच्या लगतचा परिसर आहे. तसेच, बागायती व उसाचा परिसर असल्यामुळे डुंबरेवस्तीवर,शेतात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्यांवर शेतकऱ्यांवर बिबट्याच्या दहशती घरी बसायची वेळ आली आहे. दि. ३० शुक्रवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्या जनावरांच्या गोठ्यात शिरला. गोठ्यातील म्हैस, व पारडू मोठ्यांनी ओरडल्यामुळे शेतकरी जागे झाले व शेतकऱ्यांनी बिबट्याला हुसकावून दिले. त्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा दुसऱ्या गोठ्याकडे वळविला. शेतकरी जागे असल्यामुळे आरोडाओरड्याने बिबट्याने धूम ठोकली. या ठिकाणी वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वनविभागाला वारंवार कळवले आहे..पण वनविभागाचे अधिकारी येतात पाहणी करून जातात. ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे त्यामुळे ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे, असे दावडीचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांनी सांगितले.

Web Title: Leopard terror on Dumbarevasti for 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.