शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:06 IST

वनविभागाने एवढी तत्परता अगोदर दाखवली असती तर त्या चिमुरड्याचा जीव वाचला असता

केडगाव/वरवंड : बोरीपार्धी ता.दौंड येथे ऊसतोड मजुराच्या अवघ्या अडीच महिन्याच्या बालकाचा जीव घेणारा बिबट्या वन विभागाकडून जेरबंद करण्यात आला. या नर जातीच्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.              नागरिकांची काल दि. १७ रोजी घटनास्थळी वन अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रचंड वादावादी झाली होती. वन विभागाचे वरिष्ठ कार्यालयापासून रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी कुठलेही परिस्थितीत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा आग्रह वन अधिकाऱ्यांसमोर धरला होता. मनुष्याचा एक बळी गेल्यानंतर पुढील घटना घडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वनविभागाने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसर ड्रोनच्या मदतीने पिंजून काढण्यात आला. मात्र बिबट्या सापडला नाही. रात्री परिसरात पिंजरे लावण्यात आले. मात्र सकाळी निराशाच पदरी पडल्याने वन अधिकारी आणखी चिंताग्रस्त झाले होते. त्यातच परिसरातील अनेक नागरिकांनी व संघटनांनी वन कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. बाळू भागुजी टेंगले रा. धायगुडेवाडी बोरीपार्धी ता. दौंड यांच्या क्षेत्र गट नंबर १३९ मध्ये दि १७ रोजी ऊसतोड चालू असताना ऊसतोड मजुराच्या चिमुकल्याचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात दि. १८ रोजी सायंकाळी साडेआठच्या दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. घटनास्थळी उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, वन संरक्षक दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड राहुल काळे, योगिता नायकवाडी, अंकुश खरात, वनरक्षक शितल मेरगळ, नानासो चव्हाण यांनी भेट दिली. रेस्क्यू टीम पुणे नचिकेत अवधाने, तोहीन सातारकर,वन्यजीव अभ्यासक आदित्य परांजपे, यांनी योग्य ती मदत केली. परिसरातील बिबट-मानव संघर्ष होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी ग्रामस्थांनी घ्यावी व सतर्क राहावे असे वनविभागाने आवाहन केले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागDeathमृत्यूenvironmentपर्यावरणNatureनिसर्गfarmingशेती