शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा बछडा आईच्या कुशीत

By admin | Updated: July 5, 2015 00:02 IST

वडगाव आनंद येथे काल सायंकाळी कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यात वनविभागाला यश आले होते. माणिकडोह येथील आपत्कालीन पथकाने

आळेफाटा : वडगाव आनंद येथे काल सायंकाळी कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यात वनविभागाला यश आले होते. माणिकडोह येथील आपत्कालीन पथकाने हा बछडा विहिरीजवळ मध्यरात्री ठेवला अन् पहाटेच्या सुमारास या बछड्याची आई घेऊन गेली, अशी माहिती या पथकाचे डॉ. अजय देशमुख यांनी दिली. दरम्यान वनविभागाने जीवदान दिलेला बछडा पुन्हा एकदा त्याच्या आईच्या कुशीत विसावला. मात्र वडगाव आनंद परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत आजही कायम आहे. या परिसरातील कळमजाईमातेच्या डोंगरपायथ्याशी असलेल्या चिंचखांड येथे रोहिदास गंगाराम देवकर यांच्या पंचवीस फूट खोल कोरड्या विहिरीत शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला वनविभाग व माणिकडोह येथील आपत्कालीन पथकाने जीवदान दिले. या बछड्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात प्राथमिक उपचार वाईल्ड लाईफ एस. ओ. एसचे डॉ. अजय देशमुख यांनी केले. यानंतर पुन्हा या बछड्याला घेऊन हे पथक मध्यरात्री बारा वाजता या विहिरीच्या ठिकाणी आले. त्याला के्रटमध्ये ठेवण्यात आले. हा ३ महिने वयाचा बछडा त्याच ठिकाणी ओरडत होता. अखेर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याची आई बिबट्याची मादी तेथे आली अन् या बछड्याला घेऊन गेली, अशी माहिती डॉ. अजय देशमुख यांनी दिली. शिरूरच्या पूर्व भागात बिबट्याची दहशतरांजणगाव सांडस : नागरगाव (ता. शिरूर) येथे व शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात भीमा व घोडनदीच्या परिसरातील ऊसशेतीमुळे व नदीकाठी असलेली काटेरी कुरणेही बिबट्यास लपण्यासाठी असणारी सुरक्षित जागा आहे. या भागातील नदीकाठच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या लिफ्ट योजना राबविलेल्या आहेत. विद्युत पंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे. भक्ष्याच्या शोधार्थ हे बिबटे रात्री-दिवसा मुख्य रस्ता, कच्चे रस्ते, पाणंद रस्ते यावर ठाण मांडून बसलेले असतात. या परिसरातील शेळ््या, कुत्रे यांना बिबट्याने आपले लक्ष्य केले आहे. महिला व शेतकरी, मजूर व बिबट्याच्या धास्तीने शेतात जाण्यास घाबरत आहेत. मेंढपाळ व्यावसायिक या बिबट्यांच्या भीतीपोटी आपली जनावरे अर्धपोटी चारत असल्याची वस्तुस्थिती आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे नदीकाठच्या परिसरातील शेतात ऊसलागवडी सुरू असल्यामुळे १० ते १५ शेतकरी मजूर एकत्रित काम करताना दिसत आहेत. कारण याच परिसरात शेतकरी काम करीत असताना बिबट्या तर कुठून येणार नाही ना? याची त्यांना धास्ती लागलेली असते.