शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 16:27 IST

जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

ठळक मुद्देनख्या व दाताच्या खोलवर जखमा झाल्या असून झाला मोठा रक्तस्राव

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या वडगाव-पाटोळे, दोंदे, कडूस परिसरात बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या माणसांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बुधवारी सकाळी वडगाव-पाटोळे येथील गायकवाड वस्तीत सुभाष गायकवाड यांच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वडगाव - पाटोळे, दोंदे, कडूस परिसरात बिबट्याच्या धुमाकुळाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसात बिबट्याच्या माणसांवर हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हल्ल्याच्या या घटना ताज्या असताना आज सकाळी सहा वाजता वडगाव-पाटोळे येथे सुभाष निवृत्ती गायकवाड हे घराकडे जात असताना दबा धरलेल्या बिबट्याने गायकवाड वस्तीतील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यानजीक लक्ष केले.

या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. नख्या व दाताच्या खोलवर जखमा झाल्या असून मोठा रक्तस्राव झाला आहे. परिसरात बिबट्याकडून माणसांवर वारंवार हल्ला करण्याचे प्रकार घडू लागल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

टॅग्स :Khedखेडleopardबिबट्याAccidentअपघातPoliceपोलिस