शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंचर शहरात बिबट्याचा वावर वाढला;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:39 IST

अनेक नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मंचर : शहर व परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप ऊर्फ लक्ष्मण थोरात भक्ते यांनी केली असून, तसे निवेदन वनविभागाला दिले आहे.

मंचर शहर परिसरात पिंपळगाव फाटा, भक्तेमळा, एस कॉर्नर डोबीमळा या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी भक्तेमळा येथील संदीप ऊर्फ (लक्ष्मण) थोरात भक्ते यांनी केली आहे. याबाबत मंचर ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले आहे. मंचर परिसरातील एस कॉर्नर, भक्तेमळा, पिंपळगाव फाटा या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असून, या ठिकाणावरून अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात, तसेच लहान मुले देखील मराठी शाळेत जात असतात.तसेच शेतकरीवर्ग आपल्या शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरण्याचे काम करत असतात. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने अनेकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याअगोदर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन वनविभागाचे संभाजी गायकवाड यांना देण्यात आले आहे. वनविभागाच्या वतीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी स्वप्नील बेंडे, विक्रांत भोर, राजेंद्र थोरात, श्रेयश थोरात आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसleopardबिबट्या