शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमानिमित्त एकशे दहा जणांवर कायदेशीर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 20:31 IST

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध कलमांतर्गत १०६ जणांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तसेच ६ जणांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देपोलीस दक्ष : चोख बंदोबस्त ठेवल्याची माहिती सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविणे,जातीय भावना दुखावणे आदी प्रकारांवर कारवाई करणार परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू राहणार

कोरेगाव भीमा ( आव्हाळवाडी) : पेरणे फाटा / कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एक जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन अनुयायी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या हद्दीतील एकशे दहा जणांवर विविध कलमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दल,पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, लोणीकंद पोलीस यांनी ३१डिसेंबरपासून  या कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . मानवंदनेसाठी एक जानेवारी रोजी लाखो अनुयायी  येत असल्याने, परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक नागरिक ,पोलीस मित्र,ग्रामपंचायत, उद्योजक आदींचे वाहतुक नियोजनासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध कलमांतर्गत १०६ जणांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तसेच ६ जणांना ताब्यात घेतले आहे. परिसरात सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविणे,जातीय भावना दुखावणे आदी प्रकारांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले. परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत. पुणे जिल्हा अधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक हे एक जानेवारी निमित्त दररोज परिस्थितीची समक्ष भेट देऊन माहिती घेत आहेत. लोणीकंद व शिक्रापूर पोलीस ,पोलीस पाटील ,पोलीस मित्र,ग्राम सुरक्षा जवान, यांचे बारकाईने लक्ष देत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी