शिवाजी महाराजांचे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट शिकण्यासारखे : लांजेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:40+5:302021-09-16T04:16:40+5:30

पुणे : नवीन पिढीने इतिहासाकडे डोळसपणे पाहून शिकले पाहिजे. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी तर शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज ...

Like learning Shivaji Maharaj's human resource management: Lanjekar | शिवाजी महाराजांचे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट शिकण्यासारखे : लांजेकर

शिवाजी महाराजांचे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट शिकण्यासारखे : लांजेकर

googlenewsNext

पुणे : नवीन पिढीने इतिहासाकडे डोळसपणे पाहून शिकले पाहिजे. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी तर शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक होते. त्यांच्याकडून ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट व नेतृत्वगुण शिकण्यासारखे आहेत, असे मत दिगदर्शक, अभिनेते आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले.

झील ग्रुप ऑफ मानजमेंट इन्स्टिट्यूट्सच्या ऍक्टिव्हिटी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे संस्थापक संभाजीराव काटकर, जयेश काटकर, प्रदीप खांदवे, डॉ. अश्विनी सोवनी, डॉ. योगेंद्र देवकर उपस्थित होते.

लांजेकर म्हणाले, की विद्यार्थांनी संभाषण कला ही उत्तम असली पाहिजे. शब्दाची निवड योग्य प्रकारे करता आली पाहिजे. ज्यामुळे सुसंवाद साधता आला पाहिजे. कला माणसाला माणूस बनवते व त्याची जडणघडण करते, विद्यार्थ्यांनी देशाचे उत्तम नागरिक झाले पाहिजे.

---

विविध मान्यवरांचा केला गौरव

डॉ. प्रवीण महामुनी (सीएसआर क्लब), डॉ. राहुल मोरे (आंत्रप्रेन्युअर क्लब), प्रा. भावना खोत (अंतरंग क्लब), प्रा. माधवी शामकुवर (टेक टायकून्स आयटी क्लब), प्रा. धर्मेंद्र सिंग (फोटोग्राफी क्लब), प्रा. सचिन वाडेकर (स्पोर्ट्स क्लब), प्रा. कीर्ती समरीत, प्रा. भास्कर लेंडवे, प्रा. संपदा देशमुख (रीडर्स डिलाईट क्लब) यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Like learning Shivaji Maharaj's human resource management: Lanjekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.