शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:28 IST

सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे  अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.

दुर्गेश मोरे पुणे : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) आतापर्यंत गुन्ह्यांची उकल केली म्हणून अनेकवेळा बक्षिसे घेतली. वरिष्ठांनी या विभागाच्या प्रमुखासह कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली. मात्र, असे काही गुन्हे आहेत की, त्यांचा वर्षोनुवर्षे छडा लावण्यात वारंवार अपयश येत आहे. काही गंभीर गुन्ह्यांतील संशयितांना तत्काळ जामीनही मंजूर झाले. सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे  अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.

इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे एक वर्षापूर्वी एका हॉटेलमध्ये १० जणांनी मिळून पिस्तूल व कोयत्याच्या साहाय्याने अविनाश धनवे (रा. वडमुखवाडी चन्होली ता. हवेली) यांची निघृण हत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी खुशाल तापकीर आणि विशाल तापकीर (दोघेही रा. वडमुखवाडी चन्होली, ता. हवेली) अद्याप फरार असून, पोलिसांना त्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. गुन्हेगार एक वर्षापासून फरार असतानाही पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे. खेड आणि जेजुरी भागातही गंभीर खुनाच्या घटना घडल्या असून, आजतागायत त्यांचे गूढ उलगडलेले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणांचा तपास अपूर्ण असून मृतांच्या नातेवाइकांमध्ये नाराजी पसरली आहे.

तर लोणावळा परिसरात एका नामांकित उद्योजकाच्या घरावर वारंवार दरोडे टाकले जात आहेत. चोरीस गेलेला माल अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांकडे चौकशी केली असली तरी गुन्हेगार मोकाट आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असे दिसते. एलसीबीला आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, गुप्त माहिती नेटवर्क अधिक कार्यक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुरंदर तालुक्यात वाढत्या बंदूकबाजीमुळे चिंता

पुरंदर तालुक्यात बंदुकांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी वाद, सट्टेबाजी व जमीन व्यवहारातील वादातून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा सुळसुळाट होत असतानाही पोलिसांकडून त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.

महादेव बेटिंग अॅपचा तकलादू तपास

नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या 'महादेव बेटिंग अॅप' प्रकरणातही तपास अतिशय संथ आहे. आर्थिक फसवणूक, मनी लॉन्ड्रिंगसारखा गंभीर आरोप असूनही आरोपींना लवकरच जामीन मिळाला. त्यापैकी काहीजण सध्या परदेशात असल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणात पोलिस यंत्रणा नेमकी कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी