शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनेकदा 'पुढची तारीख' घेणाऱ्या वकिलांनी स्वतःच्या लग्नाची तारीख मात्र चुकवली नाही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 17:23 IST

फुरसुंगीमधील वकील जोडप्याने ठरलेली तारीख पुढे न ढकलता फिजिकल डिस्टन्स ठेवून आपला शुभविवाह पार पाडला आहे....

ठळक मुद्देयोग्य ती खबरदारी घेऊन वकील दाम्पत्याचा विवाह :  फिजिकल डिस्टन्स ची घेतली काळजी 

पुणे :  कोर्ट आणि तारखा याचे अनोखे समीकरण आहे. सतत तारखा पडल्यामुळे न्याय मिळण्यास लागणारी अनेक वर्षे कित्येकांना माहिती आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती असताना एका वकील दाम्पत्याने मात्र आपल्या "लग्नाची तारीख" काही चुकून दिली नाही. ठरलेल्या दिवशी योग्य ती खबरदारी घेत त्यांचा विवाह नुकताच पार पडला.    फुरसुंगीमधील वकील जोडप्याने ठरलेली तारीख पुढे न ढकलता फिजिकल डिस्टन्स ठेवून आपला शुभविवाह पार पाडला आहे. यावेळी त्यांचे मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील मंगल कार्यालये, त्यात होणारे कार्यक्रम, विवाह यांना परवानगी नाकारली आहे. तसेच अनेक सांस्कृतिक व  सामाजिक कार्यक्रम देखील बंद आहेत. त्यामुळे या जोडप्याने अगदी मोजक्या माणसांत सोशल डिस्टन्स ठेवून वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे. गणेश हरपळे आणि श्यामल कामठे असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही व्यवसायाने वकील असून हरपळे हे शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करतात. तर पत्नी श्यामल न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करत आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती. त्यामुळे लग्नाची बरीचशी तयारी देखील पूर्ण केली होती. त्यामुळे तारीख न टाळता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव देखील होऊ दिला नाही.याबाबत अधिक माहिती देताना  हरपळे म्हणाले,देशात सध्या भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे हे संकट किती दिवसांनी टळेल याची कल्पना नाही. त्यामुळे आम्ही दोन्हीकडील प्रत्येक पाच माणसे आणि दोघांचे आई-वडील अशा मोजक्या माणसांत लग्न लावले. 

*  तो पैसा सामाजिक कामासाठी खर्च करणार 

लग्नावेळी सोशल डिस्टन्स पाळण्यात आले होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खबरदार्‍या आम्ही घेतल्या होत्या. अगदी कमी माणसांत लग्न केल्याने आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आम्ही वाचवलेला वेळ आणि पैसा दोन्ही सामाजिक कामांसाठी खर्च करणार असल्याचे या दाम्पत्याने सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नadvocateवकिलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस