शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जात-धर्माच्या झेंड्याखाली नंगानाच; सभागृहात कायदा मोडला जातोय - बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:47 IST

कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दडपशाही केली जाते, सभागृहातच कायदा मोडला जात असेल, तर सामान्य जनतेने काय करायचं?

नीरा : प्रत्येकजण आपल्या जातीचा किंवा धर्माचा झेंडा घेऊन बसला आहे. त्यांनी नंगानाच केला, तरी त्यांना चालते. कारण त्यांच्या हाती जातीचे धर्माचे ''झेंडे'' आहेत. पण सामान्य जनतेने प्रश्न विचारले, तर त्यांच्यावर खटले दाखल होतात. कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दडपशाही केली जाते, सभागृहातच कायदा मोडला जात असेल, तर सामान्य जनतेने काय करायचं?" असा संतप्त सवाल माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

 नुकताच दिव्यांगांसाठी लढा उभारलेल्या बच्चू कडू यांचा रविवारी (दि.२०) रात्री नीरा येथे दिव्यांग बांधवांनी नागरी सत्कार केला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी नीरा येथे मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनाला यश मिळून पेन्शन २,५०० रुपये करण्यात आली आहे. यानिमित्ताने दिव्यांग बांधवांनी हलगी वाजवून आनंदोत्सव साजरा केला. उपस्थितांना जिलेबी वाटप केले आणि कडू यांना विशेष सन्मान दिला. यावेळी पृथ्वीराज काकडे, प्रहारचे राज्य समन्वयक गौरव जाधव, महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे, राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव, बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत, दौंड तालुका अध्यक्ष लवांडे, दादा ढमे, जगन्नाथ धायगुडे, अभिजित वाडेकर, संजय भंडलकर, दिव्यांग महिला बांधव व प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी कडू पुढे म्हणाले “शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणवणाऱ्या राज्यात दिव्यांगांसाठी अजूनही आंदोलन करावं लागतं, ही दुर्दैवाची बाब आहे. संवेदनाहीन लोक सत्तेवर येतात, तेव्हा संवाद हरवतो आणि यंत्रणा कुचकामी होते. हे वास्तव बदलणं गरजेचं आहे. कार्यक्रमात अनेक दिव्यांग कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि युवा उपस्थित होते. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

कायदा एकतर्फी कसा?      राज्याचे कृषिमंत्री सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ऑनलाईन गेम अ‍ॅपच्या जाहिरातीवरूनही बच्चू कडू यांनी टीकेची झोड उठवली. “सचिन तेंडुलकर यांनी ‘रमी’ची जाहिरात केली आणि त्याचे बळी राज्याचे कृषिमंत्री ठरले. मोबाईलवर पत्ते खेळले तर चालते, पण ऑफलाईन खेळले तर पोलीस पकडतात. कायदा असाच एकतर्फी असेल का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.

नक्षलवाद केवळ दोन तालुक्यात मग जन सुरक्षा कायदा कशासाठी ?      जनसुरक्षा कायद्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “सरकार म्हणतं महाराष्ट्रात फक्त दोनच तालुक्यात नक्षलवाद आहे, मग पूर्ण राज्यात हा कायदा लागू करण्याची गरज काय? खरे नक्षलवादी कोण आहेत हे जर जाहीर केलं, तर देशात मोठा स्फोट होईल,” असा इशारा देत त्यांनी शासनाच्या हेतूंवर कडू यांनी संशय व्यक्त केला.

पुणे जिल्हाध्यक्ष पदी मंगेश ढमाळ

  प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नीरा येथील दिव्यांग मदत केंद्राचे चालक मंगेश ढमाळ यांची माजी मंत्री बच्चू कडू यांनी नियुक्ती केली. कडू यांनी मंगेश ढमाळ यांना नियुक्तीचे पत्र दिले. या पदाच्या माध्यमातून शेतकरी, नोकरदार, शैक्षणिक, आरोग्य, रोजगाराचा तसेच दिव्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूDivyangदिव्यांगFarmerशेतकरीPoliticsराजकारणVidhan Bhavanविधान भवनMahayutiमहायुती