पाण्यासह अळ्या मोफत!

By Admin | Updated: July 17, 2014 03:28 IST2014-07-17T03:28:24+5:302014-07-17T03:28:24+5:30

निळुंज (ता. पुरंदर) येथे गावाला व वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा होणाऱ्या शासकीय टँकरने दूषित पाणीपुरवठा होत असून, या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Lava with water is free! | पाण्यासह अळ्या मोफत!

पाण्यासह अळ्या मोफत!

खळद : निळुंज (ता. पुरंदर) येथे गावाला व वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा होणाऱ्या शासकीय टँकरने दूषित पाणीपुरवठा होत असून, या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत तातडीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क क रीत घडल्या प्रकाराची माहिती दिली असता, त्यांनी आपले कर्मचारी तपासणीसाठी पाठवितो, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र शासकीय यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष करीत पाठ फिरवली व कोणीही अधिकारी इकडे फिरकले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व रात्री-अपरात्री कोणत्याही नागरिकाला त्रास झाला, तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला.
या शासकीय टँकरने चिल्हावळी, शिवरकरवस्ती, जाधववस्ती, बनकरवाडी, बनकर मळा व गावठाण येथील नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. १५ जुलै रोजी पाण्याचा टँकर गावात आला असता, नागरिकांनी रात्री पाणी भरून घेतले व १६ जुलै रोजी सकाळपासून नियमितपणे या पाण्याचा वापर केला असता, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील रूपाली संतोष बनकर यांना या पाण्यात अळ्या असल्याची बाब लक्षात आली, यावर त्यांनी आपली इतर भांडी व परिसरातील शेजाऱ्यांची पाण्याची भांडी पाहिली असता, त्यातही अळ्या असल्याचे निर्दशनास आले. तोपर्यंत ज्या नागरिकांनी हे पाणी पिले होते त्यांना थंडी, ताप, हातपाय, पोटदुखणे आदी त्रास होऊ लागल्याचे समजले.
तर, याचप्रमाणे गावात आज दुपारी अडीचच्या सुमारास पाण्याची ट्रीप घेऊन टॅँकर नियमितपणे आला असता, नागरिकांनी याची तपासणी केली, तर या टँकरमध्ये पाण्यात अळ्या असल्याचे पाहिले व या प्रकाराने संतप्त होत महिलांनी या टॅँकर ड्रायव्हरला तो तसाच दूषित पाण्याने भरलेल्या अवस्थेत उभा करण्यास सांगितले. मात्र, या टॅँकरचालकाने तेथून टॅँकरसह पळ काढला. (वार्ताहर)

Web Title: Lava with water is free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.