शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

ते पार्सल माझ्यासाठी होते ऐकल्यावर हसू आले : संजय नहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 9:14 PM

अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता.या पार्सलवर काश्मीर आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांचे नाव होते. 

ठळक मुद्देसंजय नहार पुण्यातील सरहद संस्थेचे संस्थापक नहार यांच्या नावाने आलेल्या पार्सलचा अहमदनगरमध्ये स्फोट  

पुणे : अहमदनगर येथील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात स्फोट झालेले पार्सल माझ्यासाठी आलेले होते हे ऐकल्यावर पहिल्यांदा हसू आल्याची प्रतिक्रिया सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी व्यक्त केली. लोकमत कार्यालयातील वार्तालापात त्यांनी ही माहिती दिली. अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा २० मार्च २०१७रोजी स्फोट झाला होता.या पार्सलवर संजय नहार यांचे नाव होते. ते पार्सल तुमच्यासाठी आले आहे हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती असे विचारल्यावर नहार यांनी हसू आल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले की,मला पंजाबला कार्यक्रमासाठी जायचं होत.पण अचानक या पार्सलंच कळलं. सुरुवातीला हसून झाल्यावर मला भीती वाटते का याची मी वाट बघितली. पण असं काहीही झालं नाही आणि त्यामुळेच मी भगतसिंगांसारख्या क्रांतीकारकांचे नाव घेण्यास योग्य आहे याचीही मला खात्री झाली.अर्थात त्यामुळे जवळच्या मित्र परिवाराला काळजी वाटली हेदेखील त्यांनी कबूल केले. पार्सल कोणी पाठवले याचा अंदाज नसला तरी ज्याला माझे काम थांबायचे होते त्याने पाठवले असेल तर त्याच्या या कृतीमुळे माझे काम दुप्पट मोठे झाले असल्याचेही ते म्हणाले. त्या व्यक्तीने कदाचित चिठ्ठी मला चिठ्ठी पाठवली आणि तुमचे काही मुद्दे मला पटत नाही म्हणून हे पाऊल उचलत आहे असे सांगितले तर निदान संबंधित व्यक्तीचा उद्देश तरी समजला असता असेही ते म्हणाले. यापूर्वीही २०१२-१३साली धमकीची पत्रे आली होती. पण निवडलेला रस्ता असा आहे की अशा घटना घडणारच असेही मत त्यांनी व्यक्त केले.याशिवाय त्यांनी पहिल्यांदा त्यांना पुरवण्यात आलेल्या पोलीस संरक्षणचीही आठवण सांगितली. ते म्हणाले की,प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी दहशतवाद्यांचे वकीलपत्र घेवू नये म्हणून त्यांना कॉलेजमध्ये असताना आमचा गट विनंती करत होता. त्यांनी त्याची दखल न घेतल्याने आम्ही आंदोलन केले. आम्हाला पोलिसांनी अटकही केली आणि जेठमलानी यांच्या सांगण्यानुसार सोडूनही दिले. पण त्यानंतर खलिस्तानवाद्यांकडून धमकीचे पत्र  आले आणि पहिल्यांदा दोन गनमॅनची सुरक्षा पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्कुटरवरून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्याला सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते असेही त्यांनी नमूद केले.   

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेAhmednagarअहमदनगरBlastस्फोटSarhadसरहद संस्था