शिवनेरभूषण स्व. तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्काराने प्रा. काझी सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:23+5:302021-02-05T05:09:23+5:30
जयहिंद नॅशनल क्लबच्या २६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर आणि युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते ...

शिवनेरभूषण स्व. तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्काराने प्रा. काझी सन्मानित
जयहिंद नॅशनल क्लबच्या २६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर आणि युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती शिवाजीराव खैरे, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर, राजश्री बोरकर, शरद बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव, जयहिंद पॉलिटेक्निक कॉलेजचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ , सचिव विजय गुंजाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, सरपंच विक्रम भोर, सूरज वाजगे, दीपक वारूळे, देवेंद्र कोऱ्हाळे, बबन गुळवे, आशिष माळवदकर, संतोष वाजगे, डॉ. मिलिंद कसबे, मोबीन शेख, सादीक आतार आदी उपस्थित होते.
नारायणगाव व परिसरातील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी तसेच सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी जयहिंद समूहाच्या वतीने दिला जाणारा ‘शिवनेरभूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कारा’चे प्रथम मानकरी म्हणून मेहबूब काझी यांची निवड करण्यात आली. तसेच सरपंच सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश बाबू पाटे, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पदी नियुक्त झालेले माऊली खंडागळे व विकास दरेकर, युवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सूरज वाजगे, आदर्श ग्राम निर्मिती अभियान समिती सदस्य निवडीबद्दल सरपंच विक्रम भोर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर यांनी ‘यशस्वी जीवनाची आदर्श तत्त्वे’ याविषयी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे नियोजन धर्मेंद्र गुंजाळ, अशोक चाळक, छगन पटेल, अमित अडसरे, राहुल खेबडे, श्रीकृष्ण ताम्हाणे, नितीन औटी यांनी केले.
प्रास्ताविक अरविंद लंबे यांनी, तर सूत्रसंचालन सुनील मेहेर, ज्ञानेश्वर औटी यांनी केले. आभार जितेंद्र गुंजाळ यांनी मानले.
२८ नारायणगाव
जयहिंद नॅशनल क्लबच्या वतीने शिवनेर भूषण स्व. तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रा. मेहबूब काझी यांना देण्यात आला.