शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

पुणे पालिकेला उशिराने सुचले शहाणपण : टँकरसंबंधीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:02 PM

साडेतीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना टँकरसंबंधी हेल्पलाईन सुरु करण्याचे ‘शहाणपण’ सुचले आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा विभाग दरपत्रक पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि टँकर भरण्याच्या केंद्रांवर लावण्यात येणार गेले तीन महिने जादा दराने पाणी विकणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणा का नाही

पुणे : टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचे जादा दर आकारले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालिकेने अशा तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळा सुरु झाल्यापासूनच शहराच्या उपनगरांसह ग्रामीणच्या हद्दीलगतच्या भागामधून टँकरची मागणी येऊ लागली होती. एप्रिल महिन्यात तर सर्वाधिक टँकरची मागणी झाली. एवढा साडेतीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना हेल्पलाईन सुरु करण्याचे ‘शहाणपण’ सुचले आहे. अर्थात अजूनही हा निर्णय धोरणात्मकच असून प्रत्यक्षात हेल्पलाईन अस्तित्वात यायला आणखी किती वेळ लागणार याचे उत्तर अंधारात अहे.खासगी टँकर चालकांकडून नागरिकांची पिळवणूक सुरु असून गरजू नागरिकांची लूट चालू आहे. नाईलाजास्तव पुणेकर लागेल तितके पैसे मोजून पाणी विकत घेत आहेत. मात्र या संदर्भातल्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी महापालिकेने कोणतेही व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले नाही. आता उन्हाळा संपण्यास जेमतेम पंधरवडा राहिल्यानंतर टँकर दराबाबतच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन चालू करणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेले तीन महिने टँकर माफियांचे चांगलेच फावले आहे. पाण्याबाबतचे दरपत्रक पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि टँकर भरण्याच्या केंद्रांवर लावण्यात येणार आहे. पालिकेकडून देण्यात येणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर नागरिक तक्रारी करु शकणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही हेल्पलाईन सुरु होण्यासाठी आणखी किती दिवस लागतील हे स्पष्टपणे सांगता येत नाही. गेले तीन महिने पालिकेने अशा प्रकारे जादा दराने पाणी विकणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणा का राबविली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हेल्पलाईन सुरु झाल्यानंतरही टँकरधारकांवर कारवाई होईल की हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.चौकटटँकर माफिया आणि राजकारण्यांचे साटेलोटेसातत्याने भासणाºया पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात टँकर माफिया तयार झाले आहेत. यातल्या अनेकांना राजकीय वरदहस्त आहे, तर काही ठिकाणी राजकारण्यांचे स्वत:चे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचेच टँकर आहेत. महापालिकेच्या पाण्याची चोरी, चढ्या दराने पाणी विकून पुणेकरांची लुट या प्रकारांवर महापालिका प्रशासनाने कडक कारवाई केल्याचे आजवर दिसलेले नाही. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfraudधोकेबाजी