विजेच्या धक्क्याने एका लांडोरीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:24+5:302021-06-26T04:09:24+5:30
पांढरीवस्ती येथे मोरांचे प्रमाण जास्त असून गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात उष्माघाताने दोन मोरांचा मृत्यू झाला होता. या वर्षी उन्हाळ्याची तीव्रता ...

विजेच्या धक्क्याने एका लांडोरीचा मृत्यू
पांढरीवस्ती येथे मोरांचे प्रमाण जास्त असून गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात उष्माघाताने दोन मोरांचा मृत्यू झाला होता. या वर्षी उन्हाळ्याची तीव्रता कमी जाणवल्याने तसा प्रकार झाला नाही. परंतु सध्या जून महिन्याच्या सुरुवातीलाच या परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने सकाळ व सायंकाळच्या दरम्यान परिसरातील मोर पिसारा फुलवून नाचताना दिसून येतात. पांढरीवस्ती येथे महेश भुजबळ यांच्या शेताच्या परिसरात लांडोर उडत असताना खांबावरील विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने लांडोर मृत्युमुखी झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
सदर घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली.यावेळी वनक्षेत्रपाल संतोष जराड यांनी मृत लांडोरचा पंचनामा केला.यावेळी वन्य-पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे श्रीकांत भाडळे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ,पंचायत समितीच्या माजी सभापती आरतीताई भुजबळ,सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ कर्हेकर उपस्थित होते.
(फोटो ओळ:तळेगाव ढमढेरे-पांढरीवस्ती येथे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेले लांडोर दाखवताना श्रीकांत भाडळे)