लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर ; पुरंदरच्या मातीमध्ये अनेक शुरवीर योद्धे लढले स्वराज्यासाठी धाराधर्ती पडले. बेलसरची लढाई, वीर बाजी पासलकर यांची समाधी पुरंदरमध्ये आहे. उमाजी नाईकसारखा एक लढवय्या योद्धा या मातीत घडले. स्वराज्यासाठी पुरंदरचे योगदान खुप मोठे आहे. अशा शिवशाहीचा इतिहास पुरंदरच्या भुमीने पाहीला,’’ असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी मांडले.
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथे संभाजी ब्रिगेड पुरंदर कडून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना वंदन करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली. जिजाऊ जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड कडून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम कामठे यांनी संतोष यादव यांची संभाजी ब्रिगेड पुरंदर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी साहित्यिक दशरथ यादव, संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सागर पोमन, जिल्हा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा राणी थोपटे, उज्वला कामठे, संभाजी ब्रिगेड पुरंदर तालुकाअध्यक्ष संदीप बनकर, जिजाऊ ब्रिगेड पुरंदर अध्यक्षा दूर्वा उरसळ, संभाजी ब्रिगेड माळशिरस अध्यक्ष अरविंद जगताप, लक्ष्मण महाराज माजी सरपंच सुनील यादव, सारथी संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ : माळशिरस येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला.