गज कापून तिन लाखांचे कार्बोरेटर केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST2021-03-17T04:12:36+5:302021-03-17T04:12:36+5:30

अमोल मधुकर नितनवरे (वय ३४, रा.वडगाव घेनंद, ता. खेड, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ...

Lampas made a carburetor of three lakhs by cutting yards | गज कापून तिन लाखांचे कार्बोरेटर केले लंपास

गज कापून तिन लाखांचे कार्बोरेटर केले लंपास

अमोल मधुकर नितनवरे (वय ३४, रा.वडगाव घेनंद, ता. खेड, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराबवाडी येथील पावरवस्ती येथे रेडिएन्ट कन्सल्टन्सी या कंपनीचे वेअर हाऊस असून वेअर हाऊसध्ये यकूल फ्युल सिस्टीमस प्रा.ली. कंपनीचे बजाज पल्सर दुचाकीचे कार्बोरेटर ठेवण्यात आले आहेत. बजाज कंपनीकडून जशी मागणी होईल तसे कार्बोरेटरची तपासणी करून बजाज कंपनीला पाठवले जातात. वेअर हाऊसमध्ये कंपनीचे स्टाफचे चार आणि बाहेरील पाच कामगार असे नऊ लोक काम करत असतात. १५ मार्चला नेहमीप्रमाणे कामगार कंपनीत काम करत असताना पॅलेटमधील बजाज पल्सर दुचाकींचे २२० सीसीचे ३६ नग,१६० सीसीचे ११४ नग,१८० सीसीचे ६९ नग व १५० सीसीचे ७७ नग असे २ लाख ९५ हजार ४२९ रुपयांचे कार्बोरेटर कमी झाल्याचे दिसून आले. कंपनीत एकत्र शोध घेत असताना कंपनीच्या खिडकीचे गज कापले असल्याचे दिसले. १३ मार्च संध्याकाळी ते १५ मार्च सकाळी नऊच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये गज कापलेल्या खिडकीतून कंपनीत प्रवेश करून चोरट्यांनी कार्बोरेटर चोरून नेले असल्याचे उघड झाले.

Web Title: Lampas made a carburetor of three lakhs by cutting yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.