शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ललितचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना सापडला; उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून घेतले ताब्यात

By नितीश गोवंडे | Updated: October 10, 2023 16:28 IST

ललितचा भाऊ भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा उंचावल्या असून भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे

पुणे: ससून ड्रग रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मॅफेड्रॉन स्वत: बनवणारा भूषण पाटील याला पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील वाराणसीतून मंगळवारी सकाळी पकडले. भूषण पाटलासह त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला देखील ताब्यात घेतले आहे. ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. ललित पळाल्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या शोधार्थ पाठवण्यात आली होती. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विभागाने ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एम डी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित आणि त्याचा भाऊ भूषण असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते.

गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या ललितचा भाऊ भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा आता उंचावल्या आहेत. भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ललित आणि भूषण या भावंडांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांसह मुंबई आणि नाशिक पोलिसांची पथके देखील शोध घेत होती. पुणे पोलिसांनी पाटील बंधुंच्या जवळच्या नातेवाईकांसह तांत्रिक तपासाच्या आधारे भूषणला वाराणसीतून ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, लवकरच ललित पाटील याला देखील पोलिसांनी पकडावे आणि या ड्रगच्या विळख्यातून शहराला मुक्त करावे अशी मागणी पुणेकरांमधून होत आहे.

तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी मारला होता छापा...

मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी नाशिक येथील शिंदे गावात जात भूषण पाटील ज्या कारखान्यात मॅफेड्रॉन बनवत होता तेथे छापा मारला होता. यामध्ये मुंबई पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते.

पाटील बंधुंवर कोणाचा वरदहस्त..

दरम्यान मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयात जात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी धंगेकर यांनी या प्रकरणात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचे देखील संकेत दिले. तसेच ससून रुग्णालयातून ललितला पळून जाण्यासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा पोलिस आयुक्तांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी करीन असे देखील सांगितले. तसेच जोपर्यंत ससून रुग्णालयातील ललितला पाठबळ देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे देखील धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थVaranasiवाराणसी