शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

ललित पाटीलचा भाऊ भूषणला वाराणसीतून अटक; पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:57 IST

ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता.

पुणे : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मॅफेड्रॉन स्वत: बनवणारा भूषण पाटील याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील वाराणसीतून मंगळवारी सकाळी पकडले. 

ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. त्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विभागाने ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एमडी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित आणि त्याचा भाऊ भूषण असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.

गेल्या आठ दिवसांपासून चकवा देणारा भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा आता उंचावल्या आहेत. भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे भूषणला ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने ‘लोकमत’ला सांगितले.

भाड्याच्या गाेदामाचे आर्थिक ‘खोदकाम’-  नाशिक : एमडी साठा व कच्च्या मालासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाेदामाच्या गाळामालकाशी केलेले ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे खोदकाम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. -  गाेदाम उभा करणारा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही, यामुळे आता पोलिस त्याचा माग काढण्यासाठी सुगावा शोधत आहेत. -  हे गाेदाम दत्तू जाधव यांच्या मालकीचे असून, ते भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले होते.

काँग्रेस-भाजपमध्ये जुंपलीललित पाटील हा नाशिकमध्ये एमडी पावडरचा कारखाना चालवीत होता. तो उद्ध्वस्त करतानाच नाशिकमध्ये काही स्थानिक ड्रग विक्रेत्यांनाही पकडले आहे. मात्र, काही स्थानिक आमदार या ड्रग्ज माफियांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर राजकारण रंगले असून, भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पटोले यांना संंबंधितांची नावे जाहीर करावी, असे आव्हान दिले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थPoliceपोलिस