शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ललितच्या दोन साथीदारांना अटक; मोक्का न्यायालयाने दहा आरोपींना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 09:04 IST

नाशिकप्रमाणेच पुण्यातही आरोपींना अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उघडायचा होता, अशी माहिती तपासातून समोर येत आहे. 

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलप्रकरणी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला ईस्ट येथून, तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला बोईसर मुंबई येथून बुधवारी पुणे पोलिसांनी अटक केली. या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आठ आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातही उघडायचा होता कारखानानाशिकप्रमाणेच पुण्यातही आरोपींना अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उघडायचा होता, अशी माहिती तपासातून समोर येत आहे. 

...आणखी चार जणांची नावे आली पुढे 

ललित पाटील प्रकरणात आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हरिश्चंद्र पंत हा शिंदे गाव एमआयडीसी नाशिक येथे सुरू केलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून त्यांनी तसे केले होते. इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याने मेफेड्रोनची मुंबई येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंदकुमार लोहारे आणि प्रज्ञा कांबळे यांना येरवडा कारागृहातून, तसेच रेहान ऊर्फ गोलू याला तळोजा कारागृह, झिशान इकबाल शेख याला आर्थर कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे पुन्हा ताब्यात घेतले. 

प्रज्ञा कांबळे हिचा जामीन फेटाळला

एमडी विक्रीतील पैशांतून वेळोवेळी ललित पाटील, अभिषेक बलकवडे आणि भूषण पाटील यांनी प्रज्ञा कांबळे हिला उदरनिर्वाहासाठी तसेच चारचाकी, मोबाइल घेण्यासाठी कॅश आणि अकाउंटवर पैसे दिले होते.आरोपी भूषण पाटील याच्या मोबाइलमध्ये झिशान शेख व प्रज्ञा कांबळे या दोघांचे एमडी फॅक्टरी व इतर बाबींवरील संभाषण पोलिसांना प्राप्त झाले आहे.  मोक्कांतर्गत प्रज्ञा कांबळे हिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. तिच्या तपासातून ललितचे आणखी कारनामे समोर येतील, अशी शक्यात पोलिस सूत्रांनी बोलून दाखविली.

टॅग्स :Lalit Patilललित पाटीलsasoon hospitalससून हॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस