शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर येथे श्रावण सरी, दाट धुके आणि हर हर महादेवच्या गजरात घेतले लाखो भाविकांनी दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 16:52 IST

सोमवारी भीमाशंकरमध्ये दाट धुके पसरले होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, अशा वातावरणात भाविकांनी दर्शन घेतले.

ठळक मुद्देगाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन लवकर व्हावे यासाठी अभिषेक बंद

घोडेगाव : ‘ओम नम:शिवाय, ओम नम:शिवाय- हर हर बोले नम:शिवाय...’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून गर्दी दिसत आहे.सोमवारी भीमाशंकरमध्ये दाट धुके पसरले होते, तर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. अशा वातावरणात भाविक दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेत होते. रविवारी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले नाही. भीमाशंकरमधील हॉटेल, पेढे व प्रसादाच्या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. दरवर्षीप्रमाणे आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम करत होते.देवस्थानाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त अर्चना यादव, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे,  घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार हे मंदिर, पायऱ्या, वाहनतळ, बस स्थानक येथे सतत फिरून यात्रेचे नियोजन व येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम करत होते. .....................भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार यात्रेसाठी देवस्थानाने पूर्ण तयारी केली असून गाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन लवकर व्हावे यासाठी अभिषेक बंद ठेवण्यात आले आहेत. श्रावणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी वाहतूक कोंडी झाली. एसटी महामंडळाच्या मिनीबस न मिळाल्याने दोन मोठ्या गाड्या छोट्या रस्त्याने पास होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. सोमवारी पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे वाहतूककोंडी झाली नाही. देवस्थानाने खासगी मिनीबस ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी दुपारपासून या मिनीबस सुरू झाल्या आहेत. तसेच, ऐन वेळी गरज पडल्यास स्थानिक छोट्या गाड्यांना पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी माहिती भीमाशंकर देवस्थानाचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली.....................भीमाशंकरकडे येणाऱ्या वाहनांसाठी ४ किलोमीटर अलीकडे निगडाळे गावाजवळ वाहनतळ करून तेथेच सर्व वाहने थांबवली आहेत. येथून एसटी महामंडळाच्या बसने सर्व भाविक  भीमाशंकरपर्यंत जात आहेत. या नियोजनामुळे कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. तसेच भीमाशंकर यात्रेसाठी वाहनतळापासून मंदिरापर्यंत चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे; त्यामुळे दर्शन व्यवस्थित व लवकर होत आहे. असेच नियोजन पूर्ण श्रावण महिनाभर असेल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सांगितले......................................

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरShravan Specialश्रावण स्पेशलJyotirlingaज्योतिर्लिंग