शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

मोफत साडीच्या मोहापायी गमावले २५ हजारांचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 8:42 PM

साड्या हा महिलांचा वीक पॉर्इंट हे नेहमीच दिसून येते़ त्यात एखादा साड्या फुकट साड्या देतो, म्हटल्यावर भल्या भल्यांना त्याचा मोह सोडता सोडवत नाही़ या मोहापायी एका महिलेला आपल्याकडील २५ हजार रुपयांचे दागिने गमावण्याची वेळ आली आहे़

पुणे : साड्या हा महिलांचा वीक पॉर्इंट हे नेहमीच दिसून येते़ त्यात एखादा साड्या फुकट साड्या देतो, म्हटल्यावर भल्या भल्यांना त्याचा मोह सोडता सोडवत नाही़ या मोहापायी एका महिलेला आपल्याकडील २५ हजार रुपयांचे दागिने गमावण्याची वेळ आली आहे़ साड्या देण्याचा बहाणा करुन हातचलाखीने २५ हजारांचे दागिने लंपास करण्याची घटना मुकुंदनगर येथे मंगळवारी सायंकाळी चार वाजता घडली़ 

         याप्रकरणी एका ४४ वर्षांच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सुजय गार्डन येथून पर्वती दर्शन येथे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या घरी जात होत्या. त्या फोटो इमेज दुकानासमोर आल्यावर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आवाज दिला. त्यांना  मी या सोसायटीत राहण्यास असून घर खाली करणार आहे. माझ्याकडे साड्या आहेत़ तुमच्या आधी एका मावशीला मी साड्या दिल्या आहेत. तुम्हालाही साड्या देतो म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला़ त्यांच्या अंगावरील सोन्याची वेल आणि कानातील टॉप जोड हातात ठेवा, असे सांगितले़ साड्या मिळणार असल्याने त्यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे अंगावरील दागिने काढून त्याच्या हातात ठेवले़ त्याने आपल्याजवळील रुमालात काहीतरी बांधून पुन्हा त्यांच्या हातात दिले़  त्यानंतर त्याने वेल जोड व कानातील टॉप जोड १०० रुपयांच्या नोटेमध्ये बांधून त्यांच्या हातात दिल्याचे भासवले. साड्या घेऊन येतो, असे सांगून तो निघून गेला़ त्या वाट पहात तेथे थांबल्या़ त्यांनी नोट उघडून पाहिले असता त्यात सोन्याचे दागिने नव्हते. त्यामुळे महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात आले तोवर तो निघून गेला होता. त्यानंतर महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस