शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काद्याची सत्तरी!

By admin | Updated: August 24, 2015 02:54 IST

इजिप्तचा कांदा आल्याने भाव कमी होतील अशी शक्यता वर्तवली जात असताना, आज जिल्ह्यातील जुन्नर, मंचर व चाकणच्या बाजारात भाव चढेच राहिले. जुन्नरमध्ये हंगामातील

इजिप्तचा कांदा आल्याने भाव कमी होतील अशी शक्यता वर्तवली जात असताना, आज जिल्ह्यातील जुन्नर, मंचर व चाकणच्या बाजारात भाव चढेच राहिले. जुन्नरमध्ये हंगामातील उच्चांकी किलोला ७१ रुपये तर मंचरमध्ये ७0 रुपये भाव मिळाला. पुण्यात मात्र ६0 रुपये भाव मिळाला असून, आवक वाढल्याने दर कमी होतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. जुन्नर : राज्यात कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रतवारीनुसार क्रमांक एकसाठी १० किलोला ७११ रुपये या मोसमातला सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कांदा निर्यात व्यापारी धनेश संचेती यांनी दिली.गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कांदा बाजारभाव सुमारे २५० रुपयांनी वाढला. त्यामुळे शेतकरीवर्गाने मोठा आनंद व्यक्त केला. बाजार समितीच्या आवारात आज सुमारे ७००० कांदा पिशव्यांची आवक झाली आहे. कांद्याला ७११ रुपये उच्चांकी भाव, तर ६०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. रविवारी (दि. २३) झालेल्या लिलावात मध्यम ते चांगला यांसह इतर प्रकारचे कांदे आले होते. दरम्यान, शेतकरीबांधवांनी जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने साठवणुकीस योग्य असलेला टिकाऊ क्षमतेचा कांदा प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कर्नाटकमध्ये नवीन कांद्याची समाधानकारक आवक होईल, अशी शक्यता असल्याने हा नवा कांदा विक्रीस येईपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरवाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांना फायदा होत असला तरी सामान्य शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिलेला नाही. मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्यास १० किलोस तब्बल ७०० रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती सचिव अशोक राजापुरे यांनी दिली. कांद्याच्या बाजारभावास दर लिलावाच्या वेळी वाढ होत आहे. रविवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या ७ हजार पिशवीची आवक झाली. कांद्याला १० किलोस ५०० ते ७०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. गुलटी कांद्यास १० किलोस ५००, तर बदला कांद्यासही ३५० रुपये असा १० किलोस बाजारभाव मिळाला आहे. कांद्यास हा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. आतापर्यंत हा सर्वाधिक भाव असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारात नवीन कांदा दाखल झालेला नाही. नवीन कांदा दाखल होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. अवकाळी पाऊस व सध्या लागवड केलेल्या कांद्याला पाणी अपुरे पडत आहेच; शिवाय शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसल्याने आवक घसरली आहे. आगामी कालावधीत पाऊस न झाल्यास आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.- धनेश संचेती, कांदा निर्यातदार व्यापारी