शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात; ATS च्या तपासात धक्कादायक बाबींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 16:21 IST

प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला, तो नक्की काय हे तपासला जाणार

पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपणार आहे. कुरुलकर याला आज एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करणार आले होते. एटीएसच्या तपास अहवालातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर हे ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते असं ए टी एस च्या तपासात निष्पन्न झाल आहे. 

ए टी एस ने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातुन ही बाब समोर आली आहे. त्याचबरोबर प्रदीप कुरुलकर हे डी आर डी ओ गेस्ट हाऊसमधे अनेक महिलांना भेटत होते.  त्याचाही तपास करण्याची गरज असल्याच ए टी एस ने न्यायालयात सांगितलय. प्रदीप कुरुलकर यांच्या बॅक अकाउंटमधे बाहेरच्या देशातून पैसै आले का याचाही तपास ए टी एस कडून करण्यात येणार आहे. प्रदीप कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याच ए टी एस ला आढळून आल आहे. प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला आहे.  तो डेटा नक्की काय होता आणि तो त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर विभागाला दिलाय का याचा तपास करण्याची गरज असल्याच ए टी एस ने न्यायालयात सांगितल आहे. तपास कामासाठी १५ मेपर्यंत ते ats  च्या ताब्यात  राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकIndiaभारतscienceविज्ञान