"कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच", सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 10:33 AM2022-05-22T10:33:57+5:302022-05-22T10:34:44+5:30

राजस्थानी नागरिकाने राज ठाकरेंसाठी एक गाणे तयार केले आहे.

Krishna Bhagwan and Raj Thackeray are one for me opinion of Rajasthani citizens present at the meeting | "कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच", सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत

"कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच", सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत

googlenewsNext

पुणे : पुण्यात आज राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. राज ठाकरेनी औरंगाबाद, ठाणे ता सभांमध्ये भोंगे, हिंदुत्व अशा मुद्द्याला हात घातला. आता अयोध्या दौर्याबाबत देशभरात चर्चा सुरु झाली आहे. सध्यस्थितीत राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. मात्र तो दौरा का स्थगित केला याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यावरच पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सभेला सुरुवात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते, नागरिक सभेला आले आहेत. कार्यकर्त्यांनी सभेची जय्य्त तयारी केली आहे. सभेला राजस्थानी नागरिक आले आहेत त्यांच्याशी लोकमतने संवाद साधला. 

राज ठाकरेचा मनापासून आदर करणाऱ्या या राजस्थानी नागरिकाने राज ठाकरेंसाठी एक गाणे तयार केले आहे. ''आ रहे भगवा धारी राज साहेब ठाकरे. अयोध्या आ रहे भगवाधारी'' अशा प्रकारचे लहानसा गीत या नागरिकाने म्हंटले आहे. कृष्ण भगवान आणि राज साहेब माझ्यासाठी एकच असल्याचे मत या नागरिकाने यावेळी व्यक्त केले आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंच हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. तसेच रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणेकर उत्सुकतेने सभेला आले आहेत.  सभागृहाच्या बाहेर सर्वत्र गर्दी झाली आहे. पुणेकरांबरोबरच महाराष्ट्रातून असंख्य नागिरक सभेला उपस्थित राहिले. 

''राज ठाकरेंवची भूमिका योग्य आहे. त्याला धार्मिक वळण देऊन गालबोट लावले जात आहे. आम्ही त्यांच्या भोंग्यांच्या भूमिकेशी सहमत आहोत. आम्ही अयोध्येबाबत ते आज काय भूमिका मांडणार याकडेच आमचे जास्त लक्ष आहे. राज ठाकरेंनी आवर्जून अयोध्येला जावे अशी आमची इच्छा असल्याचे सभेला आलेल्या नागरिकंनी यावेळी सांगितले आहे.''   

Web Title: Krishna Bhagwan and Raj Thackeray are one for me opinion of Rajasthani citizens present at the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.