कृणाल शहा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:42+5:302020-12-08T04:11:42+5:30
पुणे : भाईचंद हिराचंद पतसंस्थेची (बीएचआर) बनावट वेबसाईट तयार करणार्या कृणाल शहा (रा. अहमदाबाद) याचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाचे ...

कृणाल शहा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे : भाईचंद हिराचंद पतसंस्थेची (बीएचआर) बनावट वेबसाईट तयार करणार्या कृणाल शहा (रा. अहमदाबाद) याचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस़ एस़ गोसावी यांनी सोमवारी फेटाळून लावला.
कृणाल शहा याच्यावर अवसायक जितेंद्र कंडारे याच्या सांगण्यावरुन बीएचआरची बनावट वेबसाईट तयार केल्याचा आरोप आहे़ पोलीस त्याच्या शोधात होते़ कृणाल शहा याने पुण्यातील विशेष न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ त्याची आज सुनावणी होऊन न्यायालयाने त्याच्याविरुद्ध पुरेसा पुरावा असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
अनिल पगारीया आणि प्रकाश वाणी यांनीही पुण्यातील न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. प्रकाश वाणी हे जितेंद्र कंडारे यांना कार्यालयात मदत करायचे.