लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्क बहरला वेश्या व्यवसाय; मसाज सेंटरमध्ये सुरु होता अवैध धंदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 23:26 IST2021-05-06T23:26:05+5:302021-05-06T23:26:15+5:30
लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्क बहरला वेश्या व्यवसाय मसाज सेंटरमध्ये सुु : तब्बल ९ मुली सापडल्या.....

लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्क बहरला वेश्या व्यवसाय; मसाज सेंटरमध्ये सुरु होता अवैध धंदा
पुणे : राज्यभरात लॉकडाऊन जाहीर झाला असून अगदी जीवनाश्यक वस्तूंनाही मर्यादित काळासाठी उघडण्यास परवानगी आहे. असे असताना कोरेगाव पार्कमध्ये उघडपणे मसाज पार्लर केवळ सुरुच नव्हती तर तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यात आढळून आले आहे. यापूर्वीच्या कडक लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्कमध्ये असे प्रकार आढळून आले होते.
कोरेगाव पार्क परिसरातील योगनिद्रा व फेमिना स्पा हे मसाज सेंटर सुरु असून तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांकडून सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार साध्या वेशात बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ९ मुलीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले.
योगनिद्रा स्पामधील मॅनेजर शुभम प्रेमकुमार थापा (वय २२, रा. आसाम) आणि फेमिना स्पा मधील मॅनेजर अफताबउद्दीन नुरुद्दीन (वय २७, रा. कोरेगाव पार्क) यांना अटक केली आहे. स्पा मालक चांद बिबी रमजान मुजावर व अब्दुल आसिफ हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.