अयोध्येत राममंदिर पायाभरणीला कोरेगाव भीमाची माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:59+5:302021-02-05T05:12:59+5:30

कोरेगाव भीमा : भारतीय स्वातंत्र्यपूर्व लढा व स्वातंत्र्यलढ्यातील संग्रामात कोरेगाव भीमाचा इतिहास ...

Koregaon Bhima soil for foundation of Ram temple in Ayodhya | अयोध्येत राममंदिर पायाभरणीला कोरेगाव भीमाची माती

अयोध्येत राममंदिर पायाभरणीला कोरेगाव भीमाची माती

कोरेगाव भीमा : भारतीय स्वातंत्र्यपूर्व लढा व स्वातंत्र्यलढ्यातील संग्रामात कोरेगाव भीमाचा इतिहास मोठा आहे, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्यानंतर बंडाचे निशान ज्यांनी हातात घेतले ते क्रांतिवीर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी कै. मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या स्मृतीचे माती कलश अयोध्येतील राममंदिर पायाभरणीसाठी जाणार असल्याने कोरेगाव भीमाचा इतिहास सोनेरी अक्षरात नोंदविला जाईल, असे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथिल क्रांतिवीर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी कै. मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या स्मृतीचे माती कलश अयोध्येतील राममंदिर पायाभरणीसाठी पाठविण्यात आले. यावेळी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अप्पासाहेब चव्हाण यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे , माजी सरपंच विजय गव्हाणे , संगीता कांबळे , बबुशा ढेरंगे , समीर इनामदार , लक्ष्मण भंडारे , रमेश भंडलकर , संपत माकर , किरण चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडलकर , वंदना गव्हाणे , सीमा भंडलकर , ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले पोलीस पाटील मालन गव्हाणे व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

यावेळी अधिक बोलताना अप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, ‘कोरेगाव भीमातील या दोन क्रांतिकारकांच्या स्मृती जतन करण्याचे काम गावाचेही असून ग्रामस्थांनी अद्ययावत स्मारक उभे करण्याची गरज आहे. तर पी. के. गव्हाणे यांनी सांगितले की, ‘कोरेगाव भीमाचे नाव इतिहासात भांडवलकर परिवाराने सुवर्णाक्षरांनी नोंदविण्याचे काम केले. अशा क्रांतिकारकांचे स्मरण अयोध्येतील राममंदिराच्या पायाभरणीसाठी होणे हे कोरेगाव भीमातील ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्वागत मधुकर कंद यांनी, तर प्रास्तविक किरण चव्हाण यांनी केले. आभार सुनील भांडवलकर यांनी मानले.

कोरेगाव भीमात उभे राहणार स्मृतिसभागृह

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथिल क्रांतिवर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सभागृह बांधण्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने निधी टाकण्यात आला असून त्याची निविदाही प्रसिध्द करण्यात आली असल्याने थोड्याच दिवसात क्रांतिकारकांचे स्मृतिसभागृह उभे राहील, असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथिल क्रांतिवर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी मारुती भीमाजी भांडवलकर यांचे स्मृतिकलश अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी सुपुर्द करताना ग्रामस्थ.

Web Title: Koregaon Bhima soil for foundation of Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.