शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा आयोगाची फाईल होणार बंद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 21:01 IST

'' या '' कारणांमुळे भीमा-कोरेगावचा चौकशी आयोग गुंडाळावा अशी विनंती करणार

ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यापासून कोरेगाव भीमा आयोगातील सदस्यांना नाही पगार

पुणे : नोव्हेंबर महिन्यापासून कोरेगाव भीमा आयोगातील सदस्यांना पगार देण्यात आलेला नाही  . यामुळे आयोगातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून येत्या काळात कोरेगाव भीमाची फाईल बंद होते की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. मागण्या, अडचणी याविषयीचे निवेदने शासनाला देऊन देखील त्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली आहे. एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राज्य सरकारला धक्का देत राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) कडे सोपवला आहे. त्यानंतर या प्रकरणाबाबत अनेक घडामोडी घडत आहेत.  राज्य सरकार या आयोगाकडे कोणतेही लक्ष देत नाही. आयोगाचे कोणतेही बिल मंजूर करीत नाही. तसेच या आयोगातील कर्मचा-यांना गेल्या नोव्हेंबरपासून पगार देण्यात आलेला नाही. यासह इतर कारणांमुळे भीमा-कोरेगावचा चौकशी आयोग गुंडाळावा, अशी विनंती करणार असल्याचे आयोगाचे वकील अ‍ॅड.आशिष  सातपुते यांनी सांगितले. अपुरा निधी, वेळेत पगार न देणे आणि सरकारचे गंभीर नसल्याने भीमा-कोरेगाव चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस आयोगाचे प्रमुख माजी न्यायमूर्ती जयनारायण पटेल राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती सातपुते यांनी शुक्रवारी दिली. भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हा आयोग नेमला गेला होता. त्या आयोगाचे प्रमुख हे माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल आहेत. तर राज्याचे माहिती आयुक्त सुमीत मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत. हा चौकशी आयोग दोन सदस्यीय आहे.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारState Governmentराज्य सरकारElgar morchaएल्गार मोर्चाNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा