शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: 'कोलते पाटील डेव्हलपर्स'ला 44 लाखांचा गंडा, फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 15:22 IST

पुणे : पुण्यातूून फसवणूकीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध 'कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड' या बांधकाम कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 ...

पुणे : पुण्यातूून फसवणूकीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध 'कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड' या बांधकाम कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. अमोल गेंदलाल साखळे, कुलदीप भिलारे, चेतन पाटील, महेश बालकिशन राठी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राठी आणि पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हर्षल रमेश नावगेकर (वय 42, रा धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल नावगेकर हे कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीमध्ये यापूर्वी राठी, साखळे, भिलारे आणि पाटील हे काम करीत होते. 

कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या काही वेंडर कंपन्यांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारांचा आरोपींनी दुरुपयोग केला. या आरोपींनी 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बनावट व्हेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्याकरता वापरले. तसेच कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या 'स्टील पॉईंट'च्या नावाने खोटे व बनावट कागदपत्र तयार बँकेत अकाऊंट काढले.

नंतर कंपनीमधील कॅन्सल केलेला चेक त्या खात्यावर डिपॉझिट केला. त्यामधून पैसे काढून घेऊन एकूण 44 लाख 1 हजार 637 रुपयांची फसवणूक केली आहे. कंपनीकडून याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. गुन्हे शाखेने तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड