मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूहल्ला, वडगाव मावळ परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 11:11 IST2024-06-18T11:10:55+5:302024-06-18T11:11:23+5:30
वडगाव मावळ ( पुणे ) : मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...

मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूहल्ला, वडगाव मावळ परिसरातील घटना
वडगाव मावळ (पुणे) : मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कान्हे फाटा येथे घडली. याप्रकरणी जखमी लक्ष्मी माताप्रसाद वाल्मीकी (वय २५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी संतोष मारुती लगली (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी हे कान्हे येथील एका कंपनीत कॅन्टीनमध्ये एकत्रित काम करतात. आरोपी फिर्यादीकडे तिचा मोबाइल नंबर वारंवार मागत होता; परंतु फिर्यादीने त्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरून सोमवारी (दि. १७) सकाळी ८ वाजता आरोपीने फिर्यादीच्या पोटात चाकू भोसकून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.