शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दुसरं लग्न करण्यासाठी पहिल्या बायकोला औषधे देऊन मारले; पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:34 IST

ही घटना मुळशी तालुक्यामध्ये घडली असून या नराधम पतीला पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या...

पिरंगुट (पुणे) : पहिला प्रेम केलेला असतानाही दुसरे लग्न करण्यासाठी नराधन पतीने आपल्या पत्नीचाच खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुळशी तालुक्यामध्ये घडली असून या नराधम पतीला पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे एका आय.सी.यु. वॉर्डमध्ये स्वप्निल विभिषण सावंत (वय २३ वर्ष रा. सांगवी ता.आष्टी जि.बीड) हा काम करीत होता. काही दिवसांपूर्वी प्रियांका क्षेत्रे (वय २२ वर्ष) या युवतीसोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता. गेल्या पाच महिन्यांपासून कासार आंबोली (ता. मुळशी ) येथे भाड्याने खोली घेऊन ते दोघेही राहत होते. परंतु दरम्यानच्या काळात स्वप्नील सावंतचे हॉस्पिटलमधील परिचारिकाअसलेल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तेव्हा तो तिच्यासोबत दुसरे लग्न करण्याचे स्वप्न पाहू लागला.

परंतु पहिले लग्न प्रियांका क्षेत्रे हिच्यासोबत झालेले असल्याने त्याला दुसरे लग्न करता येत नव्हते. केवळ दुसरे लग्न करण्यासाठी आपली पत्नी अडसर ठरत आहे, या विचाराने पत्नी प्रियांकाला राहत्या घरीच ठार मारले. त्यानंतर उपचाराचा बहाणा करीत घोटावडे फाटा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी प्रियंका क्षेत्रे यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषित केले व पौड पोलिसांना अकस्मात मयताची खबर दिली.

परंतु या सर्व घडामोडीनंतर प्रियांका क्षेत्रे हिच्या घरच्यांना धक्काच बसला. तेव्हा त्यांनी आरोपी नराधम नवरा स्वप्निल सावंत याच्याविरूद्ध मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. त्यानंतर पौड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत मोठ्या शिताफीने तपास करत स्वप्निल विभिषण सावंत याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिचा खून केला असल्याचे तपासाअंती उघड केले. 

आरोपीने थंड डोक्याने केला खून 

आरोपी स्वप्निल सांवत याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिला जिवे ठार मारण्यासाठी थंड डोक्याने विचार केला. तो काम करीत असलेल्या खाजगी हॉस्पिटल आयसीयूमधून त्याने  गुपचूप काही घातक औषधे चोरून घरी आणली. जेव्हा मयत पत्नी प्रियांका क्षेत्रे हिचे डोकं दुखत होतं त्यावेळी उपचार करण्याच्या बहाण्याने त्याने इंजेक्शनद्वारे बीपी लो व शुगर लो होणारे औषध यासह इतर काही औषधे तिच्या शरीरात सोडली. त्यामुळे प्रियंका क्षेत्रे हिचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेबे ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पवन चौधरी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलिस हवालदार आनंदा बाठे, संदिप सपकाळ, दिपक पालखे, पोलीस नाईक सिध्देश पाटील, प्रशांत बुनगे, नामदेव मोरे, गणेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांनी सखोल तपास करून गुन्हा उघडकीस केला आहे. तेव्हा या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस श्रीकांत जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस