Pune: लग्नाचे अमिष दाखवून तरुणीला नेले पळवून; मुलीने नकार देताच केले कैद

By विवेक भुसे | Updated: June 8, 2023 10:53 IST2023-06-08T10:52:35+5:302023-06-08T10:53:56+5:30

हा प्रकार वडगाव शेरी येथे २९ मे रोजी घडला...

Kidnapped young woman by luring her into marriage; As soon as the girl refused, she was imprisoned | Pune: लग्नाचे अमिष दाखवून तरुणीला नेले पळवून; मुलीने नकार देताच केले कैद

Pune: लग्नाचे अमिष दाखवून तरुणीला नेले पळवून; मुलीने नकार देताच केले कैद

पुणे : प्रेमसंबंधात लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षाच्या तरुणीला दिल्लीला पळवून नेऊन तिला कैद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. तेथे गेल्यावर आपण प्रेम करीत असलेल्या तरुणाचे अगोदरच लग्न झाले असल्याचे तिला आढळून आले. याप्रकरणी सैफ (रा. येरवडा) याच्यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २३ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथे २९ मे रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी यांच्या कार्यालयात एका २२ वर्षाची तरुणी काम करत असून ती वडगाव शेरी येथील मुलीच्या हॉस्टेलवर राहते. सैफ असे नाव असलेल्या तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला २९ मे रोजी पळवून नेले.

या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सांगितले की, सैफ याचे लग्न यापूर्वीच झाले असून मी घरी येत आहे. त्यानंतर ती अद्याप घरी आली नाही. ५ जून रोजी या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सांगितले की, सैफने तिच्या डोळ्याला पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी आणले आहे. तेथे बरेच लोक आहेत. मी तुम्हाला गुपचुप लोकेशन पाठवत आहे. त्यानंतर तिने लोकेशन पाठविले. ते दिल्लीतील नोयडा येथील असल्याचे आढळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapped young woman by luring her into marriage; As soon as the girl refused, she was imprisoned