शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

खेड - कनेरसर रस्त्यावर चारचाकींच्या धडकेत वाहनांचा चक्काचूर; एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 18:55 IST

सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

ठळक मुद्देमांडवळा येथे परस्परांविरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली

राजगुरूनगर: खेड - कनेरसर रस्त्यावर मांडवळा येथे परस्परांविरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून इतर तीघे गंभीर जखमी झाले आहेत. धंनजय हरिचंद्र गुरव (वय २१ )रा. वाकळवाडी ता खेड असे मुत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे. ही घटना सोमवारी ( दि २८ ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार कनेरसर बाजूकडून येत असताना खेड बाजूने येणाऱ्या कारची मांडवळा येथे समोरासमोर भरधाव वेगात जोरदार धडक झाली. या अपघातात मध्ये धंनजय गुरव यांचा जागीच मूत्यू झाला. तर शंकर हनुमंत हराळे ( वय२१ ), शंकर चंद्रकांत कोरडे ( वय १८ ) वाकळवाडी (ता खेड ) व वॅगनर कारचालक शशिकांत तुकाराम बरबटे रा. खरपुडी ( ता खेड ) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनाचा चक्काचुर झाला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल लाड करत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यूAccidentअपघातKhedखेड