शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:53 IST

Khed Alandi Assembly Election 2024 Result Live Updates: बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली

Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांचा सुमारे ५१७४३ मतांनी बाबाजी काळे दणदणीत विजय झाला. बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली. 

आज सकाळी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलमध्ये झालेल्या मतमोजणीबद्दल तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली आणि शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत आघाडी टिकवली. तालुक्यातील सर्वच विभागांमध्ये बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली. तालुक्यातील जनतेने बाबाजी काळे यांना भरभरून मते दिली. मतमोजणीच्या निमित्ताने तालुका क्रीडा संकुलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता. २६ टेबलवरून २० मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या. सुमारे १५० अधिकारी व  कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. बाबाजी काळे यांच्या विजयानंतर राजगुरुनगर शहरात मिरवणूक काढण्यात करण्यात आली होती.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी निवडणूक निर्णय जाहीर केली. या प्रसंगी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकांसह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, रवींद्र मोरे, राम बिजे,  पी.डी. माळी, मनीषा खैरे आदिंसह महसूलचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024khed-alandi-acखेड आळंदीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी