शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर ग्रामसभेत रस्ते अतिक्रमणांवर खडाजंगी चर्चा

By admin | Updated: August 19, 2015 00:05 IST

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरपंच भीमाताई डोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत अतिक्रमणे व रस्त्यांबाबत चर्चा झाली़

ओतूर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरपंच भीमाताई डोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत अतिक्रमणे व रस्त्यांबाबत चर्चा झाली़ या ग्रामसभेसाठी उपसरपंच बाळासाहेब घुले, दिलीप डुंबरे, अ‍ॅड़ कैलास पानसरे, माजी सरपंच कांचन पानसरे, शशिकांत थोरात, अरुण ढमाले, वर्षा हिरे, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संभाजी तांबे, विनायक तांबे, वैभव तांबे, भानुविलास गाढवे, रामदास ढमाले, अरुण ढमाले, श्री कपर्दिकेश्वर देव धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे, हेमंत डुंबरे, गंगाराम डुंबरे, महेंद्र गांधी, पानसरे, अ‍ॅड़ जयराम तांबे, विवेक पानसरे, संतोष तांबे, आशिष शहा, विश्वासराव डुंबरे, आत्माराम गाढवे, मीराबाई डुंबरे, सविता थोरात, गणेश तांबे, जयप्रकाश डुंबरे, जी़ एम़ डुंबरे, बबनदादा तांबे, मीराताई खंडागळे, शशिकांत थोरात, कृषी अधिकारी डी़ एम़ राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ श्याम बनकर, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार ए़ व्ही़ राठोड, तानाजी तांबे, भगवान तांबे, संकेत डुंबरे, पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड, ओतूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस़ एऩ गवारी, माजी जि़प़ सदस्य तुषार थोरात यांच्यासह सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते़प्रारंभी ग्रामविकास अधिकारी एस़ एऩ गवारी यांनी मागील ग्रामसभेचा वृत्तांत वाचून दाखविला़ गेल्या ग्रामसभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी याविषयी काही ठरावांची पूर्तता करण्यात आली़ काहीची पूर्तता होणे बाकी आहे, असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले़ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार लाभार्थीचे नावे व कृती आराखडा यावर चर्चा झाली. लाभार्थींची नावे व निवड झालेली कामे जाहीर करण्यात यावी व तसा ठरावही करण्यात आला़ ऐनवेळच्या विषयात रस्त्याला पडलेले खड्डे रस्त्यांचे डांबरीकरण, गावातील शासकीय जागेतील अतिक्रमणे, गावांच्या गटारीवर बांधलेले ओटे, गावात नवीन पाईपलाईन करण्यात आली त्याचे ठेकेदार कोण? काम योग्य केले नसल्याने त्या ठेकेदाराला सब ठेकेदाराला ग्रामसभेपुढे हजर करावे ़ त्याचे पेमेंट रोखावे, गावाला फसविणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी़ फौजदारी गुन्हा दाखल करावा, गावाचे पाणी वेळेत सोडावे, ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी समिती नेमावी़ खड्डे खडी व वाळू टाकून भरून घ्यावेत, या विषयावर विविध युवक, ग्रामस्थ यांनी मते मांडली़ (वार्ताहर)