शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमुक्त अभियान भोसरीमध्ये सुरू

By admin | Updated: June 27, 2015 03:49 IST

पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, चौकाचौकांत साचणारे पाणी या त्रासातून भोसरीकरांची सुटका होण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी

भोसरी : पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, चौकाचौकांत साचणारे पाणी या त्रासातून भोसरीकरांची सुटका होण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी ‘खड्डेमुक्त भोसरी’ अभियान सुरू केले आहे. एसएमएस अथवा ई-मेलद्वारे तक्रार केल्यानंतर २४ तासांच्या आत खड्डा दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार लांडगे विविध अभिनव उपक्रम राबवत आहेत. दर वर्षी पावसामुळे अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडतात. खड्डे पावसामुळे दुरुस्त करता येणार नाहीत, असे स्थापत्य विभागाचे अधिकारी सांगतात. पावसाळा सुरू झाल्याने नेहमीच उद्भवणाऱ्या खड्डे प्रश्नाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. औद्योगिक परिसर, लगतची समाविष्ट गावे, भोसरी गावातील वर्दळ यांमुळे भोसरी आणि परिसरामध्ये खड्ड्यांचा प्रश्न तीव्र आहे. पावसाळ्यात लहान-मोठे अपघात खड्ड्यांमुळे घडतात. सखल भागात पाणी साचते. त्याचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यंदा या त्रासातून काही अंशी का होईना, सुटका होण्याची शक्यता आहे. आमदार लांडगे यांनी मागील दोन दिवसांपासून खड्डेमुक्त भोसरी अभियान सुरू केले आहे. त्यासाठी लांडगे यांनी स्वत:चे काही कार्यकर्ते व महापालिका अधिकाऱ्यांची एक ‘टीम’ तयार केली आहे. मतदारसंघातील नागरिकांची तक्रार आल्यास १२ ते २४ तासांच्या आत महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि स्थापत्य विभागाच्या मदतीने खड्डा दुरुस्ती केली जाणार आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी निचऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. (वार्ताहर)